यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
दिनांक 15. जुलै 2023 शनिवार रोजी शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे माता-पिता पालक, शिक्षक सभा संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आर जे महाजन हे होते तसेच व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री एस जे पवार. श्री बी इ महाजन, श्री सदाशिव निळे हे उपस्थित होते. यावेळी पालक सभेच्या नूतन कार्यकारणीमध्ये माता उपाध्यक्षपदी सौ शारदा किरण माळी पिता उपाध्यक्षपदी श्री नितीन भिला बडगुजर, सचिवपदी श्री एम ए महाजन, सहसचिवपदी श्री वासुदेव डिगंबर बडगुजर यांची निवड करण्यात आली.[ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री एस जे पवार यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर विद्यालयातील उपशिक्षक श्री बी ई महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे महाजन यांनी स्पर्धा परीक्षा, ऑलिंपियाड परीक्षा, शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षण पद्धती याविषयी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाय बी सपकाळे यांनी केले तर आभार श्री आर सी जगताप यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



