यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
दिनांक 18 जुलै 2023 मंगळवारी शारदा विद्या मंदिर साकळी येथे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब सुभाष भास्करराव महाजन हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके साहेब, किशोर चौधरी केंद्रप्रमुख हे होते.[ads id="ads1"]
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष, प्रमोदभाऊ रमेश सोनवणे,ज्येष्ठ संचालक, मुख्तार दादा तडवी, माजी उपसरपंच मा किरण मधुकरराव महाजन,सन्माननीय संचालक मंडळ, विद्यालाचे प्राचार्य आर जे महाजन, पर्यवेक्षक श्री एस जे पवार, श्री बी इ महाजन, सदाशिव निळे, जी एल चौधरी, आर सी जगताप व मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले यानंतर नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, ऑलिम्पियाड परीक्षा, इयत्ता दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी यांचा व त्यांच्या पालकांचा गुलाब पुष्प, प्रशस्तीपत्र, मेडल, ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.[ads id="ads2"]
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी माननीय विश्वनाथ धनके व केंद्रप्रमुख माननीय किशोर चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेविषयी गौरवोद्गार काढले.
यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब सुभाष भास्करराव महाजन यांनी कॉपी मुक्त अभियान, शिक्षण पद्धती, विविध स्पर्धा परीक्षा, गुणवंतांचे कौतुक करून सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी एल चौधरी यांनी केले तर आभार आर सी जगताप यांनी मानले
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी साठी पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले...