यावल(सुरेश पाटील)
यावल येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या दि.१४ जुलै रोजी झालेल्या मासिक सभेत केळीवर आकारण्यात येणारी ३% सुट रद्द करण्याचा शेतकरी हिताचा महत्वाचा निर्णय घेतला यामुळे शेतकरी व केळी व्यापारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की,केळीचे मोजमाप झाले नंतर गाडीचे वजन इलेक्ट्रॉनिक तोल काट्यावर करण्यात येत होते.त्यावर व्यापाऱ्यांकडून ३% सुट (कटती) शेतकऱ्यांकडून कापण्यात येत असे.त्यामुळे शेतकऱ्यांचे एकूण वजनात ३% इतके आर्थिक नुकसान होत होते.याकडे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने आपले लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी दि.१४ जुलै रोजी झालेल्या मासिक सभेत शेतकऱ्यांकडून कापल्या जाणाऱ्या ३% सुट यापुढे घेण्यात येऊ नये असा महत्वपूर्ण निर्णय घेतला.[ads id="ads2"]
तसेच यापुढे तीन टक्के कपातीची तक्रार संबंधित केळी व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा ठराव सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने सर्वानुमते पारीत केला आहे.आणि याबाबतच्या लेखी सूचना बाजार समितीने सर्व लायसेन्सधारक केळी व्यापारी,कमिशन एजंट यांना दिल्या आहेत.३% सुट रद्द केल्याच्या निर्णयाचे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून केळी व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर
हेही वाचा : मनात जिद्द बाळगून रिक्षाचालकाची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक..
“बाजार समितीने ३% सुट रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असून व्यापारी जबरी पध्दतीने सुट आकारणी करीत असल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तत्काळ तक्रार करावी.आणि तक्रार आल्यानंतर बाजार समिती निश्चितपणे कायदेशीर कारवाई करेल"असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील यांनी सांगितले.