यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील टाकरखेडा येथिल महिला घरकुल, रस्ता, गटारी, विविध शासकीय योजना या समस्या घेऊन थेट यावल पंचायत समिती मध्ये पोहचल्या व आपल्या व्यथा सहाय्यक गटविकास अधिकारी सपकाळे यांच्या कडे मांडल्या.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे कि तालुक्यातील टाकरखेडा येथिल महिला यांच्या गावात समस्या सुटत नसल्याने शेत मजुरी करणाऱ्या महिला आपला एक दिवसाचा रोज बुडवून ग्रामपंचायत टाकरखेडा येथे त्यांनी आपल्या गावातील समस्या वेळोवेळी माडल्या असता समस्या न सुटल्याने वैतागून टाकरखेडा येथिल महिला यांनी आज दिनांक :- 14/07/2023 रोजी थेट गाठत यावल पंचायत समिती येथे येऊन यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी के सी सपकाळे यांची भेट घेऊन गावातील समस्या मांडल्या असता [ads id="ads2"]सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून दिनांक :- 18/07/2023 रोजी टाकरखेडा येथे पंचायत समिती मध्ये आलेल्या महिलांचे स्वतः समस्यांचे निराकार करण्याचे आश्वासन देण्यात येऊन ग्रामसेवक यांना टाकरखेडा येथिल समस्या कडे लक्ष देण्याचे सांगितले व आलेल्या महिलांचे समाधान केले त्यावेळी टाकरखेडा येथिल शिला किशोर चौधरी, अनुराधा पूनमचंद चौधरी, लिलाबाई नारायण पाटील, नयनाबाई महेंद्र बोरसे, रतानाबाई रघुनाथ चौधरी, अलकाबाई गोकुळ चौधरी, बेबाबाई सुधाकर पाटील, शालुबाई धनसिंग चौधरी यांच्या सह महिला उपस्थित होत्या.



