यावल (सुरेश पाटील)
काल शुक्रवार दि.१४ जुलै रोजी रात्री ११:३० ते १२ वाजेच्या दरम्यान चोपडा रोड वरून यावल शहरात येणारे नायरा पेट्रोल पंपा समोर अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर क्र.एमएच -१९-३४२६ यावल महसूल मधील सर्कल,तलाठी यांचे पथकाने पकडून यावल तहसील कार्यालय आवारात जमा केले.[ads id="ads1"]
सदर कारवाई वेळी मंडळ अधिकारी फैजपूर,मंडळ अधिकारी भालोद,तलाठी भालोद,हिंगोणे,डोंगर कठोरा,यावल,फैजपूर,दहिगाव,अंजाळे,अकलुद,न्हावी प्र.यावल व चालक अरविंद बोरसे हजर होते,डंपर चालक-मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.



