पाटबंधारे विभागात 35 कोटीचा भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईचे लेखी पत्र मिळाल्याने उपोषण मागे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या पाटबंधारे विभागात 35 कोटीचा भ्रष्टाचार,गैरप्रकार झाला असल्याने चौकशी करून कारवाई होण्यासाठी गेल्या चार दिवसापासून नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी जळगाव येथील जळगाव पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते परंतु लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सहाय्यक अधीक्षक अभियंता आर.एल.रोटे यांनी चौकशी करून कार्यवाही करण्याचे काल दि.२० रोजी नितीन रंधे यांना लेखी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे.[ads id="ads1"] 

       लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता दि. 20 जुलै २००२३ रोजी नितीन रंधे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,जळगांव पाटबंधारे विभागातील कामांची चौकशी होणेसाठी आपण दि.१७ जुलै २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसलेले आहे.आपल्या दि. २१/०६/२०२३ रोजीच्या उपोषण नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे जोपर्यंत थर्डपा र्टी / दुस-या कार्यकारी अभियंता कडून चौकशी होत नाही तोपर्यंत जळगांव पाटबंधारे विभाग,जळगांव कार्यालया समोर आमरण उपोषण करीत आहे असे नमूद केलेले असल्यामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव या कार्यालयाने आपण उपोषणापासून परावृत्त व्हावे या उद्येशाने, संदर्भीय पत्रान्वये एन.एम. व्हट्टे, कार्यकारी अभियंता,धुळे पाटबंधारे विभाग,धुळे यांची सदर प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.[ads id="ads2"] 

  संदर्भीय पत्राची प्रत आपणास देण्यासाठी दि.१९ जुलै२०२३ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेच्या दरम्यान आपल्या उपोषणस्थळी जळगांवपाटबंधारे विभाग,जळगांव या कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,जळगांव या कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता यांनी आपली भेट घेतलेली असून त्यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान आपण संदर्भीय आदेशाची प्रत स्विकारण्यास नकार दिला.

       आपल्या मागणीनुसार सदर प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले कार्यकारी अभियंता धुळे या आपल्या तक्रारीच्या अनुषंगानेच चौकशी करणार असल्यामुळे चौकशी दरम्यान वेळोवेळी आपणास बोलाविण्यात येईल तरी आपण आपल्या उपोषणापासून परावृत्त व्हावे व या कार्यालयात सहकार्य करावे असे लेखी आश्वासन दिल्याने नितीन रंधे यांनी उपोषण सोडले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!