यावल (सुरेश पाटील) यावल तालुक्यात संस्थेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यालयातून मुला मुलींना पोषण आहार दिला जातो यात मात्र काही खाजगी व जिल्हा परिषदेच्या शाळांमधून पोषण आहार दिल्यानंतर,पोषण आहार वाटप केल्यानंतर तालुकास्तरापासून जिल्हा आणि राज्यस्तरावर पोषण आहार कोणता..? केव्हा..? कोणत्या वेळेस, किती प्रमाणात दिला..? याचा ऑनलाइन रिपोर्ट सादर केला जातो परंतु पोषण आहार वाटप करताना काही शाळांमधून सोयीनुसार वैयक्तिक शाळा करून मुला मुलींचा उपस्थितीचा आकडा आणि पोषण आहार दिल्याचा जो उल्लेख सोयीनुसार केला जातो तो रिपोर्ट बरोबरच आहे किंवा नाही याची खात्री करण्याकडे यावल गटविकास अधिकारी आणि यावल गटशिक्षण अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तालुक्यातून होत आहे.[ads id="ads1"]
यावल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी संस्थेच्या अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत पोषण आहार वाटप करताना विद्यार्थ्यांची संख्या किती..? आणि प्रत्यक्षात कागदोपत्री किती दाखविली आहे..? हे मात्र त्या शाळेच्या लिपिकास मुख्याध्यापकास आणि फक्त संस्थाचालकास,पोषण आहार देणाऱ्या बचत गटात माहिती असते.( बचत गटाला पोषण आहार देण्याचे काम सुद्धा त्यांच्या सोयीनुसार आणि त्याच्या जवळच्या विश्वासातल्या बचत गटाला दिले जात आहे ) अनेक शाळांना जो पोषण आहार/ तांदूळ जो दिला जातो त्यापैकी शाळेला पोषण आहार पुरवठा होतो त्याच दिवशी त्याच वाहनातून पन्नास टक्के पोषण आहार गायब होत असतो. शाळेला किती पोषण आहार आला..? आणि शाळेत किती पोषण आहार शिल्लक आहे..? याची खात्री मात्र संबंधित विभागाकडून केली जात नसल्याने पोषण आहारात मोठी शाळा सुरू आहे.[ads id="ads2"]
अनेक लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांच्याकडून वाढदिवसानिमित्त आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मार्फत अनेक शाळांमध्ये शाळेतील मुला-मुलींना खाऊ वाटप केला जातो ज्या दिवशी खाऊ वाटप केला जातो त्या दिवशी शाळेतून त्या मुला-मुलींना पोषण आहार दिला जात नाही, परंतु त्या दिवशी पोषण आहार दिल्याचा ऑनलाईन मेसेज मात्र शासन दरबारी, शिक्षण विभागात पद्धतशीरपणे दिला जात असल्याने हा मेसेज बरोबर आहे किंवा नाही..? याची खात्री मात्र यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी करतात का..? आणि खात्री केल्या नंतर संस्थाचालक शाळेला लेखी खुलासा मागितल्यानंतर संबंधित शाळा आपल्या सोयीनुसार खुलासा देत असून नंतर शिक्षण विभागाकडून नेमकी कारवाई काय केली जाते..? याबाबत यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून या हेराफेरीच्या प्रकरणाबाबत लेखी तक्रार सोमवारी दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे.