समविचारी पुरोगामी विचारांचे आजपासून : राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 जळगाव  (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  समता, सामाजिक न्याय व बंधुभाव आधारित संवैधानिक राष्ट्रवादाच्या समर्थनासाठी  या मूल्यांना अधिक बळकटी देण्याची रणनीती  जळगावमध्ये शनिवारपासून (1 जुलै) होणार्‍या राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनात आखली जाणार आहे. रविवारी (2 जुलै) संमेलनाचा समारोप होईल. शनिवारपासून (1 जुलै) शहरातील एमआयडीसीमधील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयानजीक असलेल्या विनुज वर्ड हॉलमध्ये राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन होत आहे. संमेलनात राज्यभरातील विविध संस्था-संघटना, विचारवंत, लेखक, पत्रकार अशा विविध क्षेत्रांतील सुमारे एक हजार प्रतिनिधी येणार आहेत. यात युवक-युवतींचा सर्वाधिक सहभाग आहे. बी. जे. कोळसे- पाटील, निरंजन टकले, निखिल वागळे, नितीन वैद्य, सुनील तांबे, रजनी बक्षी, श्रीमंत कोकाटे, भारत पाटणकर, मेधा पाटकर, फैजल खान, सुभाष वारे आदींचा सहभाग राहणार आहे.

शनिवारी (1 जुलै) सकाळी 11 ते 12.30 या वेळेत उद्घाटन सत्र, दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत राष्ट्रीय व महाराष्ट्रस्तरीय आव्हाने या विषयावर चर्चासत्र, 2.30 ते 4.30 या वेळेत गटचर्चा होईल. सायंकाळी 5 ते 6.45 या वेळेत समूहचर्चा, तर सायंकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेत परिसंवाद, रात्री 8.00 ते 8.30 या वेळेत जागर महाराष्ट्राचा यात 2024 च्या तयारीसाठी राज्यभर करण्याच्या कृती कार्यक्रमाचा आराखडा सादर केला जाईल. रात्री 8.30 पासून मंजू भारद्वार लिखित 

गोधडी हे नाटक सादर करण्यात येईल. दुसर्‍या दिवशी रविवारी (2 जुलै) सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत आदल्या दिवशी मांडलेल्या आराखड्यावर विभाग व जिल्हानिहाय चर्चा होईल. दुपारी 12.30 ते 2.00 या वेळेत गटचर्चा, तर दुपारी 3 ते सायंकाळी 5.00 या वेळेत संमेलनाचा समारोप होईल. मान्यवरांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात निवासव्यवस्था करण्यात आली आहे, संमेलन स्थळी निमंत्रक प्रतिभा शिंदे,संमेलनाचे स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे,डॉ.अब्दुल करीम सालार,राम पवार, सचिन धांडे,डॉ.सत्यजित साळवे, हरिश्चंद्र सोनवणे, भरत कर्डिले, विनोद रंधे, जयसिंग वाघ, दिलीप सपकाळे,विनोद सपकाळे,प्रतिभा शिरसाठ,सुरेंद्र पाटील,डॉ.मिलिंद बागुल,जयसिंग वाघ,बापू पानपाटील,सोमनाथ पाटील,अजय पाटील अनेक कार्यकर्ते संमेलन यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!