भीम आर्मीचे चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा : मुकुंद सपकाळे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- भीम आर्मी प्रमुख तथा दलित चळवळीचे राष्ट्रीय नेते चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर सहारनपुर येथे जात्यान्ध लोकांनी हल्ला करुन त्यांना जीवेठार मारण्याचा जो प्रयत्न केला गेला तो या देशातील दलित नेतृत्व भीम आर्मीचे चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा : मुकुंद सपकाळे प्रकार आहे तेंव्हा त्या मारेकारी लोकांना ताबड़तोब अटक करावी अशी मागणी अनुसूचित जाति , जमाती अन्याय निवारण समिति प्रमुख मुकुंद सपकाळे यांनी केली.[ads id="ads1"] 

      या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले असता मुकुंद सपकाळे बोलत होते . त्यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की संबधित गुन्हेगार त्वरित अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.[ads id="ads2"] 

      या प्रसंगी जयसिंग वाघ यांनी देशातील एकूण भयावह परिस्थिति मांडून दलित समाजाने एकसंघ होवून संघर्षा करावा असे सांगितले .

      या प्रसंगी प्रा . सत्यजीत साळवे , सुरेश तायड़े , महेंद्र केदार , मनोहर लोखंडे , हरिश्चंद्र सोनवणे , प्रतिभा शिरसाठ , चंदन बिरहाडे , रविन्द्र तायड़े , विजय करंदीकर , वाल्मीक सपकाळे , दिलीप सपकाळे साहेबराव वानखेड़े सह बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!