यावल (फिरोज तडवी)
गुरुपौर्णिमे निमित्त जि.प मराठी आणि उर्दू शाळेत दोघे शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस तथा माजी सरपंच शालेय समितीचे माजी अध्यक्ष जलीलदादा सत्तार पटेल हे होते यावेळी कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमात मराठी शाळेचे कर्त्यव्यदक्ष मुख्याध्यापक धनराज कोळी ,उर्दूचे मुख्याध्यापक कुतबुद्दीन जनाब, मराठी शाळेचे उपशिक्षक जाकीर शाह सर,उर्दूचे उपशिक्षक फिरोज तडवी सर,अस्लम तडवी सर,या सर्वच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला कय्युम पटेल,सलीम तडवी,अरशद पटेल सह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते सदर कार्यक्रमानंतर जलीलदादा पटेल आणि मुख्याध्यापक धनराज कोळी सर यांनी विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहार माध्यन भोजनाचा आस्वाद घेतला.