यावल ( सुरेश पाटील)
महाभारत लेखक महर्षी व्यास ऋषी यांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा/ व्यास पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात, शांतीचे साजरा करण्यात आला यावेळी रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे स्वर्गीय खासदार तथा आमदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोलदादा हरिभाऊ जावळे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली, व्यास महाराजांच्या मंदिराला ११ क्विंटल कच्ची केळी व पिकलेली केळी याचे तोरण तयार करून बांधण्यात आले होते यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने,विधिवत मंत्रोच्चार पुरोहिताच्या माध्यमातून पूजा करण्यात आली
पूजेचा मान वड्री येथील किशोर भास्कर चौधरी,पंकज अशोक पाटील कठोरा,संतोष गोपाळ पाटील धानोरा,देविदास कालिदास नेमाडे भुसावळ यांना मिळाला.याप्रसंगी यावल तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने श्री महर्षी व्यासांच्या दर्शन रांगेत शिस्तीने घेतले व दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आले, तर एका भाविकांने 500 लिटर गोड दुध अनेक भाविकास वाटप केले या ठिकाणी ट्रस्ट व स्वयंसेवक यांनी उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केलेत संध्याकाळी उशिरा पर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आला.यावल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.