पालकांनी लेकरांच्या अभिरुची व छंदांना प्रोत्साहन देऊन व्यक्तीमत्व फुलू द्यावे- सुनिता भंडारी
जळगांव - ' पालकांनी लेकरांच्या अभिरुची व छंदांना प्रोत्साहन देऊन त्यांचे व्यक्तिमत्व फुलू द्यावे 'असे भावनिक आवाहन सौ.सुनीता भंडारी यांनी केले.' कुटुंब तुमचे, प्रबोधन आमचे ' या कार्यक्रमांतर्गत जागतिक पालक दिनानिमित्त आयोजित मोहन नगर जळगाव येथे रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सुनिता भंडारी पालक सभेत बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.भाग्यश्री धर्माधिकारी असून प्रमुख अतिथी सुधीर वाणी,सौ. आश्विनी मोसे शिक्षणप्रेमी पालक उपस्थित होते.[ads id="ads1"]
पुढील मार्गदर्शनात सौ.भंडारी म्हणाल्या की,' पालकांनी दबावात गृहपाठ न घेता खेळकर वातावरण ठेवावे.पालकांनी प्रामुख्याने पाल्यांमध्ये स्वयंअध्ययनाची गोडी निर्माण करावी.पालकांनी नेहमी सुलभकाच्याच भूमिकेतून अभ्यास घ्यावा.गरज असेल तेथेच मार्गदर्शन करावे अन्यथा उच्च शिक्षणासाठी घराबाहेर गेल्यानंतर विद्यार्थी स्वयंअध्ययनाशिवाय बेशिस्त,दिशाहीन अथवा ध्येयशुन्य होऊन अपयशी होत जातात.विद्यार्थ्यांचे गेल्या नऊ वर्षापासून निरंतर शिक्षणतज्ञ तथा समाजसेवक,साहित्यिक चंद्रकांत भंडारी व सौ.सुनीता भंडारी दांपत्य घर - शाळा - अभ्यास आणि संस्कार यांची सांगड घालणारा विना खर्चिक उपक्रम राबवत आहेत.योगायोगाने आजच्या जागतिक पालक दिनानिमित्त हा त्यांचा या शैक्षणिक वर्षातला २५ वा कार्यक्रम आहे. [ads id="ads2"]
***********************
*शिक्षणतज्ज्ञ भंडारी यांचे पालक - विद्यार्थ्यांसाठी विशेष योगदान* : -
निवृत्त पदवीधर शिक्षक चंद्रकांत भंडारी हे के.सी.ई.सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. भंडारी सर महाराष्ट्रात साहित्यिक,समीक्षक,स्तंभलेखक उपक्रमशील शिक्षक म्हणून सुप्रसिद्ध आहेत.
विद्यार्थी गुणवत्ता व पालक निती या संदर्भात त्यांची ' संवाद लेकरांशी ,चिंतन स्वतःशी ', ' देव माणसं आणि गुणी लेकरं ', ' देव भेटलेला विद्यार्थी ', ' शोध शिक्षणासह माणसांचा ' ही पुस्तकं शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्र स्तरावर खुप नावाजली आहेत.भंडारी सर ग्रंथप्रेमी असून त्यांच्या संग्रही ३५००० पुस्तकांचा संग्रह आहे.मात्र कोविड पूर्वकाळात त्यांनी कोणताही वाजागाजा न करता एका शैक्षणिक समुहाला दुर्मिळ व दर्जेदार निम्म्या पुस्तकांचे ग्रंथदान केले.एवढेच नव्हे तर त्यांच्या गळ्यातील शबनम मध्ये नेहमी पुस्तकांची चळत असते. चालता फिरता आणि प्रवासामध्ये सुसंवादात भावणाच्या शिक्षणप्रेमी पालक व वाचकांना भंडारी मुक्तहस्ते स्वलिखित ग्रंथ भेट आदरपूर्वक देतात.शैक्षणिक व साहित्यिक कार्यक्रमात तसेच प्रसंगोपात ग्रंथालयात भंडारी सरांनी दिवंगत मातापित्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजतागायत तब्बल ७५००० हजाराची एकूण ११०० पुस्तकांचे ग्रंथदान केले आहे आणि करीत आहेत.' दाढीवाले मोफत पुस्तक वाटणारे बाबा ' म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ते सुपरिचित आहेत.
***********************
पालक सभेत शिक्षणतज्ञ चंद्रकांत भंडारी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ' सहा ते चौदा ही आठ नऊ वर्षे शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीला आकार देणारे वर्ष आहेत. विद्यार्थ्यांच्या लेखन वाचन या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या भावनिक,शारीरिक आणि अवांतर लेखन,वाचन कौशल्यांना विकसित करण्याच्या दृष्टीने पालकांनी त्यांना दररोज गृहपाठ घेण्यासह एकूण दोन तास हितगुज व अनौपचारिक संस्कार देण्यासाठी वेळ द्यावा.' धर्माधिकारी यांच्या अध्यक्षीय मनोगताने कार्यक्रमाचा समारोप झाला.एक तास रंगलेल्या या अनौपचारिक कार्यक्रमास चंद्रकांत वाणी,श्रीमती सैंदाणे यांसह एकूण १२ कुटूंबातील २५ पालकांची उपस्थिती होती.



