यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी या गावातील रहिवाशी सैय्यद असलम सैय्यद हसन हे यावल कडून साकळीकडे मोटार सायकलने प्रवास करीत असतांना असतांना यावल साकळी मधोमध वढोदा रोड वर सापडलेला मोबाईल परत केल्याने त्यांचे साकळीसह परिसरातून कौतुक केले जात आहे.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे कि तालुक्यातील साकळी येथिल रहिवासी सैय्यद असलम सैय्यद हसन हे यावल वरून साकळी गावाकडे प्रवास करीत असतांना बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गांवर वढोदा या गावाजवळ त्यांना मोबाईल पडलेला दिसला व त्यांनी लागलीच आपली मोटार सायकल थांबावली. व मोबाईल ताब्यात घेतला. आणि साकळी गावात येऊन ज्या व्यक्तीचा मोबाईल होता त्यांना कॉल लावण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल ला पिन कोडं असल्यामुळे त्यांच्याने संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांनी ज्या व्यक्तीचा मोबाईल हरवला आहे त्याच्या संपर्काची वाट बघीतली व त्यांचा संपर्क झाल्याने साकळी येथिल सैय्यद असलम सैय्यद हसन यांनी त्यांची चौकशी करून नेमका मोबाईल त्यांचाच आहे.[ads id="ads2"]
तेव्हा ज्या व्यक्तीचा हा मोबाईल होता तो व्यक्ती साकळी गावाजवळ असलेले शिरसाड या गावाचे गिरीष अत्तरदे या युवकांचा असल्याचे समजल्याने साकळी येथिल रहिवासी सैय्यद असलम सैय्यद हसन यांनी साकळी येथिल माजी ग्रामपंचायत सदस्य सैय्यद अशफाक सैय्यद शौकात यांच्याशी संपर्क साधून त्यांना सदर ची हकीगत सांगितली व शिरसाड येथिल गिरीष अत्तरदे यांना बोलोवून त्यांच्या ताब्यात हरवलेला त्यांचा यॅपल कंपनीचा 60,000 हजार किंमतीचा मोबाईल परत करून इमानदारी दाखवली या मुळे सैय्यद असलम सैय्यद हसन यांचे साकळीसह परिसरातून कौतुक केले जात आहे.शिरसाड येथिल रहिवासी गिरीष अत्तरदे यांना साकळी येथिल सलून चे मालक सतिष न्हावी यांच्या दुकानात बोलवून माजी ग्रामपंचायत सदस्य सैय्यद अशफाक सैय्यद शौकात, सतिष न्हावी, सामाजिक कार्यकर्ते वसीम खान याच्या उपस्थित मोबाईल परत करण्यात आला त्यावेळी शिरसाड येथिल गिरीष अत्तरदे यांनी त्यांचे आभार मानले.



