यावल शहरात दररोज बेशिस्त वाहतूकमुळे शाब्दिक चकमक : मोठी अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल  (सुरेश पाटील)

यावल शहरात यावल बस स्टॅन्ड पासून तर मेन रोडवर,आणि कोर्ट रोडवर तलाठी कार्यालया पर्यंत,गवत बाजार आणि म्हसोबा देवस्थान रोड,तसेच बोरावल दरवाज्या पर्यंत दररोज बेशिस्त वाहतुकीमुळे वाहनधारकांमध्ये आप-आपपसात जोरदार कडाक्याचे भांडण होऊन काही मिनिटे भर रस्त्यात ट्राफिक जाम होत असते.[ads id="ads1"] 

  वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण का होत असतो.हे मात्र यावल नगरपालिका,यावल पोलीस प्रशासनास,विरोधी आणि सत्ताधारी गटातील अनेक लोकप्रतिनिधी,समाजसेवकांना आणि काही संघटनांना ही गंभीर समस्या लक्षात येत नसल्याने भविष्यात यावल शहरात मोठी अप्रिय घटना घडवू शकते..? याची नोंद संबंधितांनी घ्यावी असे यावल शहरातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे.[ads id="ads2"] 

      यावल शहरात मेन रोडवर  देशी दारू विक्री दुकानाजवळ आज दि.२५ रोजी सकाळी १२ वाजता वरील छायाचित्र, व्हिडिओ प्रमाणे ट्राफिक जाम झाली त्यात दोघं वाहनधारकांमध्ये झालेली शाब्दिक चकमक दिसून येत असल्याचा पुरावा पुरेसा आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!