यावल तालुका : प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल आगारातून मनवेल ते पंढरपूर बस रवाना झाली. जगभरातील तमाम वारकऱ्यांचे दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाच्या भेटीची अर्थात दर्शनाची आस लागलेले लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विविध मार्गांनी रवाना झालेले असतांनाच पुरुषोत्तम (मास अधिकमास ) निम्मत मनवेल येथून पहिली एसटी बस यात्रेकरूंना घेऊन गुरुवारी मनवेल येथून रवाना झाली. [ads id="ads1"]
अधिक मास निम्मत वारकऱ्यांसाठी बस यावल आगार प्रमुख डी.बी.महाजन व वाहतुक नियंत्रक यांचा नियोजनातून यावल आगारातून पंढरपूर बस सोडण्यात आली. [ads id="ads2"]
साकळी येथील माऊली अँग्रोचे संचालक भरत पाटील यांच्या हस्ते पंढरपूर बसचे पूजन करून झेंडी दाखविली. यावेळी बसचे चालक एस.आर.कोळी, वाहक आर.टि.कोळी, वाहतूक नियंत्रक सी.आर.पाटील, नितीन सोनार (यावल), शांताराम पाटील,गणेश पाटील,उदयभान पाटील आदींची उपस्थिती होती.