यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
साकळी गावाचे कायम रहिवासी सध्या यावल येथे राहत असलेले अनिल निळकंठ जंजाळे यांची राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जातीच्या यावल तालुका अध्यक्ष पदी निवड केली आहे.[ads id="ads1"]
अनिल निळकंठ जंजाळे यांच्या कडे या आधी यावल शहर उपाध्यक्ष पद होते त्यामुळे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँगेस पक्षाची ध्येय धोरण व पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्न करून पक्षाचे संघटन यावल शहरात मजबुत केले त्याच्या कार्याची पक्षाने दखल घेत यावल तालुक्यात अनुसूचित जाती ची व पक्ष संघटन मजबुत करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या कडे सोपविण्यात आली असुन त्यांची अनुसूचित जाती यावल तालुका अध्यक्ष पदी निवड केली आहे.[ads id="ads2"]
त्यांना नियुक्ती पत्र जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीचे जिल्हाअध्यक्ष वकील कैलास ना. शेळके यांनी दिले असुन अनिल जंजाळे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती यावल तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी चे जळगांव जिल्हा अध्यक्ष प्रदीप जी पवार, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, यावल तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे,अल्पसंख्यांक अध्यक्ष मुनवर खान, यावल शहर अध्यक्ष कदीर खान, आदिवासी सेलचे अध्यक्ष बशीर तडवी, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष क्लास भाई, सरपंच संदीप भैय्या सोनवणे, युवा जिल्हाउपाध्यक्ष किरण महाजन,यांच्या सह जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी, यावल तालुका काँगेस कमिटी, जळगांव जिल्हा व यावल तालुका, अल्पसंख्यांक, आदिवासी सेल चे अध्यक्ष तसेच सर्व काँगेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन केले.



.jpg)