आ.चंद्रकांत पाटील यांच्या कडून सावद्यात नविन सुन्नी कब्रस्तानाच्या कामाला सुरूवात!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- गेल्या १५ दिवसांपूर्वी रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील समाजसेवक सोहेल खान,फरीद शेख,युसूफ यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळाने सुन्नी मुस्लिम कब्रस्तानाची नियोजित जागेचे कंपाउंड वॉल सह या जागेवर रस्ते,कुपनलिका,लाईट व जनाजा नमाजपठणसाठी शेड उभारून मिळावे.अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती.[ads id="ads1"] 

  यावेळी १५ दिवसात कब्रस्तानाच्या कामाची सुरुवात केली जाईल असे एक शब्दी वचन सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांना दिले होते.तरी दिलेल्या शब्दांची स्वतःजातीने आठवण ठेवून थेट आ.चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मुस्लिम बांधवांशी भेटून व कब्रस्तानच्या नियोजित जागेवर कामाची सुरुवात करण्यासाठी मुक्ताईनगर येथून अफसर खान व सावदा शहर शिवसेनाप्रमुख सुरज परदेशी यांना आज दि.३१ जुलै रोजी पाठवले असता सर्वप्रथम जेसीबी द्वारे या जागेवरील काटेरी वृक्ष व झाडे झुडपे मुळासकट काढण्याचे काम करण्यात आले आहे.[ads id="ads2"] 

  यानंतर अफसर खान यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने उर्वरित सुविधा देखील जलदगतीने मार्गी लावण्यात येणार आहेत असे ठामपणे सांगितले.यावेळे हाजी कादीर खान,डॉ.अन्सार खान,कलीम जनाब,माजी मुख्याध्यापक अय्युख खान,गौसखान सर,शेख निसार अहमद,शेख कमरूद्दीन,मोईन खान,रशीद बागवान,अनिस इब्राहिम,आबिद मोमीन,शेख खालील,अब्दुल्ला भाई बारदान वाले,शेख नजीर, इलियास खान उर्फ काल्या,अली शेरखान,खालिद भाई इत्यादी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!