ऐनपूर महाविद्यालयात अर्थशास्त्र व नियोजन मंडळाचे उदघाटन व लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 ऐनपूर महाविद्यालयात अर्थशास्त्र व नियोजन मंडळाचे उदघाटन व लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स. व. प. कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे अर्थशास्त्र व नियोजन मंडळाचे उदघाटन व लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न झाला. प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. [ads id="ads1"] 

  प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीता एस. वाणी यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी अर्थशास्त्र व नियोजन मंडळाच्या स्थापनेचा उद्देश, वर्षभर घेण्यात येणारे कार्यक्रम याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते प्रा. व्ही. एच. पाटील, डॉ. रेखा पाटील, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन,  यांनी या दोन्ही महान नेत्यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात त्यांनी समाजाला जागृत करणारे,हे दोन्ही कणखर, आदर्श व्यक्तीमत्व. फक्त दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊंनी अनमोल साहित्य लिहिले अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ते साहित्य समाविष्ट आहे.[ads id="ads2"] 

   जहाल मतवादी लोकमान्य टिळकांच्या साहित्या बद्दल आणि राजकीय, सामाजिक आर्थिक विचारांचा उहापोह त्यांनी केला. थोर देशप्रेमी, दूरदृष्टी चे ते व्यक्तीमत्व होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने आपल्या मार्गदर्शनात दोन्ही नेत्यांचे कार्यावर प्रकाश टाकून या दोन्ही नेत्यांचे चांगले गुण आत्मसात करा आणि देशप्रेमाची भावना ठेऊन आदर्श व्यक्ती बना असे त्यांनी आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र मुळे यांनी आणि आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर कोळी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!