"तडवी द गाईड" संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे वृक्षारोपण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

"तडवी द गाईड" संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे वृक्षारोपण

रावेर प्रतिनिधी (मुबारक तडवी)

अकलूद ता. यावल  येथे तडवी द गाईड संस्थेतर्फे नावाचे नाही तर कामाचे वृक्षारोपण या तत्त्वावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमाची सुरूवात या मान्सून मध्ये करण्यात आली.[ads id="ads1"] 

या उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत तडवी द गाईड संस्थेच्या सदस्यांनी गेल्या पाच वर्षापासून या दिवशी 275 च्या वर झाडे भुसावळ व यावल परिसरात लावून ती जगवली सुद्धा आहेत. मागील काळात सुद्धा सर्व उपाययोजना आखून उपक्रमात खंड न पडू देता सदस्यांनी वृक्षारोपणाचे आपले हे कार्य सुरूच ठेवले आहे.

तसेच आजही पूर्वी लावलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेतला.[ads id="ads2"] 

अशफाक जरदार तडवी यांनी सांगितले की आदिवासी तडवी समाज हा आजही निसर्गाशी जोडलेला आहे आणि निसर्गाला आपले काहीतरी देणे लागते म्हणून या नावाचे नाही तर कामाचे वृक्षारोपण पर्यावरणीय मोहिमेमध्ये तडवी समाजातील लहान मोठ्यांपासून, स्त्री-पुरुष या सर्वांचा दरवर्षी सहभाग नोंदविला जातो तसेच झाडांना योग्यरित्या जपणाऱ्या व्यक्तींचा जाहीर सत्कार करण्यात येतो.

हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री वजीर निजाम तडवी यांनी भूषविले, प्रमुख पाहुणे म्हणून श्री हुसेन मैताब तडवी, सातपुडा शेतकरी विकास मंडळ यावल, जरदार सरदार तडवी सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार, सुगरा जरदार तडवी, याकूब सिकंदर तडवी ग्राम पंचायत सदस्य अकलूद, विजय कोळी, श्री गुप्ता, सुभाष भील आणि गणेश भील यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सलिम नशिर तडवी, हमजान पिरखा तडवी, झुल्फिकार लतीब तडवी, ईशल सलिम तडवी, जिशान रिजवान तडवी, आयेशा अशफाक तडवी, अरसलान अशफाक तडवी, अरहान अशफाक तडवी, सोनू खलील तडवी, हुसेन इब्राहिम तडवी, भावेश कोळी यांनी कष्ट घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!