या भागामध्ये भटक्या श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. श्वानांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. श्वानांच्या घोळका रात्री वेळी अवेळी भुंकण्यांमुळे लहान मुले घाबरून जातात. रस्त्यावर चालताना लहान मुले महिला मनुष्यांना चावा घेण्यासाठी जोरजोरात भुंकत मागे धावतात शिवाय या श्वानांमुळे घरासमोर होणारी घाण ही तर मोठी समस्या झाली आहे. चारचाकी वाहने आणि दुचाकीस्वारांच्या तसेच शाळकरी मुले विद्यार्थ्यांचेही मागे हे श्वान लागतात. त्यातून अपघातही घडत आहे. तसेच अनेकांना या मोकाट कुत्री चावा ही घेतला आहे.[ads id="ads2"]
निंभोरा -सावदा दसनूर परिसरातील नागरिक शेतकरी शेतमजूर कामगारांना रात्र पाळीसाठी सावदा फैजपूर साठी कामावर निघालेले कामगार, दुसऱ्या पाळीवरून घरी परतणारे कामगार यांना या श्वानांचा नियमित त्रास सहन करावा लागतो.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर
श्वानांची संख्या कमी व्हावी म्हणून त्यांचे निर्बीजीकरण बंदोबस्त करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, आणि लवकरात लवकर या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मोठा वाघोदा येथील निंभोरा रस्त्यावरील रहिवासी रहदारी करणारे शाळकरी विद्यार्थी शेतकरी शेतमजूर कामगारांतर्फे करण्यात येत आहे.



