यावल (फिरोज तडवी)
मध्य प्रदेशातील पूरपरिस्थिती अनेक दिवसांपासून ढग फुटी व बेमोसमी मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन जीवित हानी मोठ्यप्रमाणात झाली असून त्यंना दैनंदिन आहार घेणे जिक्रीचे झाले आहे,बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील व शहापूर तालुक्यातील फोपणार गावाची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे,
या उद्देशाने जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर तालुक्यातील तडवी भिल्ल समाजाच्या कार्यकर्त्यानी मदतीसाठी गावा गावातून मदतीचे आवाहन करून संसार उपयोगी वस्तू त्याचं प्रमाने जिवणावक वस्तू आर्थिक मदत गोळा करून यावल तसेच पाल या भागातून तडवी भिल्ल समाजाचे कार्यकर्ते आज फोफनार या गावाला मदत घेऊन रवाना झाले.तडवी भिल्ल समाज मदतीसाठी पुढे सरसावल्या ने समजत एक मोठा संदेश दिला.