रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग अंतर्गत सन २०१५-१६ ते सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात केलेल्या खर्चात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी ग्रा प सदस्य सतीश निकम यांनी केली आहे.[ads id="ads1"]
सतीश निकम यांना माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेल्या कागदपत्रात ही माहिती समोर आली आहे. सन २०१५ ते २०२०-२१ या कालावधीत तत्कालीन दोन सरपंच यांच्या कार्यकाळात हा खर्च करण्यात आला असून खर्चात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे,[ads id="ads2"]
अवाजवी किंमतीने साहित्य खरेदी करून निकृष्ट बांधकामे करण्यात आली आहेत यावर जवळपास एकोणतीस लाख रुपये नियमबाह्य पद्धतीने खर्च झाल्याचे तक्रारदार निकम यांचे म्हणणे आहे. निकम यांनी सर्व पुरावे चौकशी वेळी गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात येतील ,असेही कळविले आहे.