सावदा येथील सार्वजनीक बांधकाम उपविभाग उठले जीवावर?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


"रावेर चे श्रीराम पाटील यांनी ११ महिन्यांपूर्वी स्वखर्चाने बुजविले होते खड्डे..."

----------------------------------

"सावदा सा.बा.उपविभाच्या हाकेच्या अंतरावर साईबाबा मंदिर समोरील रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असून,सदरील विभाच्या समोरुन रावेर कडे जाणाऱ्या नविन कॉंक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या मधोमध दुभाजकांची जागेत पडलेले मोठ मोठे खड्ड्यांमध्ये सध्या पाऊसाचे पाणी साचल्याने जीवघेण्या अपघात होण्याची दाट शक्यता असून,अशा रस्त्यावरुन यंत्रणेतील अधिकारी सह लोकप्रतीनीधी काळा चष्मा लावून ये-जा करताना याकडे दुर्लक्ष करून मार्गस्थ होतात असे सुज्ञ लोकांकडून बोलले जात असून आश्चर्यही व्यक्त केले जात आहे."[ads id="ads1"] 

-------------

सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा ते फैजपूर व सावदा ते मोठा वाघोदा दरम्यान रस्त्यावर बरेच दिवसांपासून जागोजागी खड्डेच खड्डे पडले होते व आहे.यामुळे सदर रस्त्यावर लाहन मोठे अपघात होत असताना,कितेक लोक अपंग झाले,तर काहीची प्राणहानी झाली.या अनुषंगाने वेळोवेळी वृत्तपत्रात बातम्या सुद्धा प्रसारित होवून सुद्धा सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागास जाग न आल्याने रावेर येथील श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी रावेर ते सावदा येथील साईबाबा मंदिर पर्यंत २० कि.मी.च्या रस्त्यावरील अपघातास आमंत्रण देणारे सर्व खड्डे सप्टेंबर २०२२ मध्ये ४० ब्रास मुरूम टाकून स्वखर्चाने बुजविले होते.हे मात्र खरे आहे.[ads id="ads2"] 

 तसेच सावदा ते रावेर हा रस्ता बुऱ्हानपूर-अंकलेश्वर महामार्गावरील असल्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरणाचा अहवाल महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वादात सापडल्याचे बोलले जाते?या खड्डेमय रस्त्यांच्या संदर्भात तोंडी व लेखी अर्ज प्राप्त असतानाही सावदा सा.बां. उपविभागास या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची सुधारणा करावी असे वाटले नाही.सबब या रस्त्यावरील मोठ मोठे खड्ड्यांमध्ये पाऊसाचे पाणी साचल्यामुळे जीव मुठीत घेऊन कोणता खड्डा चुकवावा खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने थेट वाहन खड्ड्यात धडकते,याच्याने वाहनाचे नुकसान तर होतेच परंतु वाहनात मान,पाठ,कंबरदुखीशी आधीच ग्रस्त प्रवासींच्या दुखण्यात अधिक भर पडते.आणि बरेच प्रवासींना अशा गंभीर दुखण्यांना समोर जावे लागते.तसेच नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण बनलेले आहे.तरी याकडे थेट जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून रस्त्यांची वेळेवर दुरुस्ती न करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभारच लोकांचे होणारे जीवघेण्या अपघातास कारणीभूत असल्याचे संतप्त मत अपघातात जखमींसह त्यांचे तेवाईक घटनेच्या वेळी व्यक्त करताना दिसून येते.क्रमशः

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!