ऐनपुर ,खिर्डी परिसरात अवैध गावठी देशी विदेशी दारुची ढाबे होटलवर विनापरवाना होतेय खुलेआम विक्री
ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
अवैद्य गावठी दारू ,पन्नी दारू देशी-विदेशी दारूबद्द्ल कालच्या आढावा बैठकीत आमदार मंत्री यांनी गावागावात धाब्यांवर दहा रुपयात पण पन्नी, दारू तसेच गावठी दारू विक्री होत असते अशी स्पष्ट भाषेत खरडपट्टी केलेली दिसून आली निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील दोन नंबरचे धंदे सुरू असल्याची चर्चा काल जोमात सुरू होती. [ads id="ads1"]
रावेर तालुक्यातिल निंभोरा पो.स्टे. हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे प्रकरणी प्रशासनाला जाग लवकर येईल का? पोलिस स्थानकांच्या हद्दीत निर्धास्तपणे अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळतेय रात्रंदिवस पत्त्यांचे क्लब , सट्ट्यांच्या पिढ्या तसेच अनधिकृत ढाबे होटेल्सवर बेकायदेशीर विनापरवाना अवैध देशी विदेशी दारुची विक्री केली जात आहे गावागावात गल्ली बोळात गावाठी किराणा दुकान सारखे दारुची अड्डे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.[ads id="ads2"]
या अवैध धंदेवाईकांची नांवे ठिकाण संबंधीत निंभोरा पोलिस स्थानकाचे प्रभारी अधिकारी,बीट पोलिस कर्मचारी यांना माहीत नसतील का?? मग पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतेय? कुठे आर्थिक पाणी मुरतेय का?जर नाही तर मग हे अवैध सट्टा पत्ता बेकायदेशीर विनापरवानगी दारु विक्रेते दोन नंबरचे धंदेवाईकांवर कठोर कारवाई का केली जात नाही?या अवैध धंद्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देवून अवैध धंदे कायमचे बंद करण्याची मागणी या परीसरातील नागरिक करत आहेत.




