बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर यावल येथे मोकाट गुरांमुळे अपघाताची दाट शक्यता तरीही प्रशासक मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) गेल्या महिना दोन महिन्यापासून यावल शहरातून गेलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर यावल बस स्टॅन्ड परिसरात आणि यावल टी पॉईंट जवळ अत्यंत रहदारीच्या,वर्दळीच्या ठिकाणी तसेच गावात प्रत्येक प्रभागात, गल्लीबोळात मेन रोडवर आणि चौकात मोकाट गुरांचा, कुत्र्यांचा आणि डुकरांचा मोठा हैदोस सुरू आहे यामुळे एखाद्या वेळेस मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची तसेच जातीय सलोखा,कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,तरी सुद्धा यावल नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग,प्रभारी मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने आणि यावल नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने यावलकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"] 

         मोकाट गोरे वाहतुकीच्या मार्गावरच ठाण मांडून बसत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना जागा नसते,पायदळ चालणाऱ्यांची मोठी पंचायत होत असते शिवाय वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे,आवाजामुळे जनावरे बिथठरल्यास अपघात देखील होऊ शकतो तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन बेशिस्त वाहतुकीतून किरकोळ वाद देखील होत असतात तरीही आज यावल शहरात याबाबत नगरपालिका आणि इतर दुसरे कोणीही बोलायला तयार नाही आणि नगरपालिका संबंधित  विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रभारी मुख्याधिकारी आणि प्रशासक म्हणून नियुक्त झालेले प्रांताधिकारी कैलास कडलक यांचा वचक नसल्याने नगरपरिषद कर्मचारी आपल्या सोयीनुसार नगरपरिषद कार्यालयात येत असतात व सोयीनुसार कामे करीत असतात यावल शहरात पूर्ण प्राथमिक सुविधांचे बारा वाजले आहेत.[ads id="ads2"] 

        यावल शहरात प्रत्येक प्रभागात आणि गल्लीबोळात एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या गुरांचे मूळ मालक कोण..? आणि ती आपले गुर मोकळे का सोडतात..? याच प्रमाणे यावल शहरात विकसित भागात अनेक प्लॉटवर बांधकामे झालेली नसल्याने त्या ठिकाणी रात्रंदिवस डुकरांचा,कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे सामान्य नागरिक,महिला लहान मुले,मुली मंदिरात,प्रार्थना स्थळी,शाळा कॉलेजात जाताना या मोकाट डुकरांचा आणि कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे अनेक ठिकाणी कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतला आहे, घाण स्थितीत असलेले डुकरे रस्त्याने जाणाऱ्या माणसांच्या अंगावर घाण उडवीत असतात या मोकाट गुरांचा,डुकरांचा, कुत्र्यांचा यावल नगरपरिषद कधी बंदोबस्त करणार मालकांवर दंडात्मक कारवाई का होत नाही.? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी आणि प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी यावल नगरपालिका कर्मचाऱ्यांना लेखी सूचना देऊन मोकाट गुरांचा,डुकरांचा,कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!