तसेच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ प्रकरणी आम्ही तीव्र शब्दात मी शेतकरीच असून महिलांना लाजिरवाणी असे हे प्रकरण असून या व्यक्तीस तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावल तालुका व शहर महिला शिवसेना गटामार्फत करण्यात येत आहे अशा असशील प्रवृत्तीचा निषेध करीत असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. आणि असे न झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मनिपुर घटनेत जबाबदार व्यक्तीस अटक करून भर चौकात फाशी देण्यात यावी असे दिलेल्या निवेदनावर वैशाली चौधरी,रेखा संतोष खर्चे,तालुका अध्यक्षां सौ. रजनी उदय चौधरी,यावल शहर प्रमुख सुरेखा शरद कोळी, उपशहर प्रमुख वैशाली चौधरी, उपजिल्हा संघटक सौ.अनिता कवडीवाले,सौ.भारती सुनील बारी,श्रीमती द्रोपदा झांबरे,उप तालुका संघटक वैशाली जोशी, उपजिल्हा सौ.बेबी कडू पाटील, सौ.मनीषा गोपाळ चौधरी इत्यादी महिला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता महिलांनी आपली स्वाक्षरी केली आहे.
मणिपूर येथील घटनेचा व भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा यावल तालुका महिला शिवसेनेकडून तीव्र निषेध
सोमवार, जुलै २४, २०२३
यावल (सुरेश पाटील) भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह मणिपूर येथे घडलेल्या घटने संदर्भात यावल तालुका महिला शिवसेना संघटनेने आज यावल तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून कडक कारवाई करणेबाबत यावल तहसीलदार यांना निवेदन दिले.[ads id="ads1"]
यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मणिपूर येथे नुकतीच महिलांवर अत्याचाराची वेळ घटना घडली त्या घटनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे कृत यावल तालुका महिला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी केली.[ads id="ads2"]



