रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दिनांक 6 जुलाई 2023 रोजी नायब तहसीलदार श्री संजय तायड़े यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की सांगवे गावातील सांडपाणी काढ़णेसाठ गृपग्रामपंचायत विटवे यांना तोंडी व लेखी स्वरुपात सांगितले व म.तहसीलदार यांना दिनांक 14/06/2022 एक वर्षा पूर्वी निवेदन देऊन सुद्धा कुठलेही कार्यवाही न केल्याने, काल 5 जुलाई 2023 रोजी जास्तीचा पाऊस पडल्याने गावातील सांडपाणी जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने सांगवे गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना त्याच स्थितीत तेथे राहावे लागत असून त्यांचा संसार उघड्यावर पड़ला आहे.
तरी प्रशासनाने याकड़े लक्ष घालुन सांगवे गावाचे सांडपाणी तात्काळ काढून उपाय योजना करावी. अन्यथा येत्या 10 तारखेला सांगवे गावातील नागरिकांनसह महाराष्ट्र जनक्रांति मोर्चा युवा जिल्हाअध्यक्ष साहेबराव वानखेड़े हे उपोषणाला बसतील अशा आशयचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी संदीप कोळी, दिपक भिल, गजानन भील , वंदना भील, सुनील बारेला, कलाबाई भील, उषाबाई भील, संजय भील, नंदा भील, कृष्णा कोळी, छायाबाई भील इ सांगवे गावातील नागरिक उपस्थित होते.