मणिपूर येथील अत्याचारातील महिलांना न्याय द्या - लोकसंघर्ष मोर्चा : रावेर तहसीलदार यांना दिले पदाधिकारींनी निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिधी/ मुबारक तडवी 

भारत देशाचे महामहिम राष्ट्रपतीजी  आपल्या देशामधे आजपर्यन्त कधी न घडलेला कधी न पाहिलेला महिलांवरील एवढा मोठ्ठा अत्याचार संपुर्ण भारतासह जगभरात विवीध वृत्तवाहीनी व शोषल मिडियाद्वारे सर्व महिला पुरुष पाहत असुन, आपल्या कार्यकाळात अश्या घटना घडत असतील तर हे भारत मातेच्या आमच्या आया, बहीणींसाठी खुप मोठ दुर्दैव समजाव लागेल.[ads id="ads1"] 

सदरची घटना घडून दोन अडीच महिने उलटुन हि मणिपुर मधे सुरु असलेला हिंसाचार, अत्याचार तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार सह जगभर नाव मोठ करणारे पंतप्रधान मणिपुर येथे जावुन शांततेचे अवाहन करू शकले नाही, जे शासन आपल्या देशातील आपल्या राज्यातील महिलांच संरक्षण करु शकत नाही, जे सरकार त्याच कर्तव्य पार पाडू शकत नाही, अश्या निष्क्रीय राज्य व केंद्र सरकारला घरी बसवण्याचा व भारतीय जनतेला न्याय देण्याचा अधिकार बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाने दिलेला आहे.[ads id="ads2"] 

 लोक संघर्ष मोर्चा संघटनेच्या वतीने  १) मणिपुर मधिल घडलेल्या घटनेतील सर्व दोषी ते १ दोन नव्हे तर झुन्ड होते त्या सर्वांना अटक करत तात्काळ फाशी देण्यात यावी.

२) मणिपुर मधिल कुकी समाज आदिवासी असुन त्यांच्या अधिकारावर गदा आनण्यासाठी त्यांना आपल्या गावातून व प्रदेशातून बेदखल करण्याचे जे षडयंत्र राज्य सरकारच्या व प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरु आहे ते तात्काळ थांबवुन कुकी समाजातील सर्व लोकांना पुरेसे संरक्षण देत त्यांना पुन्हा आपल्या गावी प्रस्थापित करून, त्या सर्व आरोपीवर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार कायद्यासह दंगली व मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी लोक संघर्ष मोर्चा तर्फे करण्यात आली आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!