रावेर प्रतिनिधी /मुबारक तडवी
डास निर्मुलन उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा हे ८ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या मध्यभागी असलेल्या गावातील सांडपाणी वाहून नेणारा नाला त्यामध्ये साचलेले गाळ दुर्गंधीय पाणी पाण्यावर उगवलेले उंच गवत गावातील तुंबलेल्या गटारी उकिरडे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे सर्दी फ्लू डेंग्यू मलेरिया सदृश आजाराचे रुग्ण वाढले आहेत.[ads id="ads1"]
ग्रामपंचायत प्रशासनाने गटार फवारणी धुर धुरळणी व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन आवश्यक अशा उपाययोजना करण्याची मागणी मोठा वाघोदा येथील रहिवासी करीत आहेत तसेच मोठा वाघोदा येथील आरोग्य केंद्रात पदे रिक्त असल्याने रुग्णांसह प्रसुतीसाठी महिला वर्गाला असह्य त्रासासह वेदना सहन कराव्या लागत आहेत.[ads id="ads2"]
जळगांव जिल्हा परिषद ला नुकतेच रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदी तात्काळ कर्मचारी नियुक्त करावे आणि
डेंग्यू मलेरिया निर्मूलन मोहिमेच्या माध्यमातून उपचारासह उपाय योजना राबवावी अशी मागणी गाववासियांसह सुज्ञ नागरिकांनी केली आहे