यावल नगरपरिषदेचा अनानोंदी कारभाराबाबत प्रशासक यांच्याकडे माजी नगरसेवकांची तक्रार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष यांनी आज शुक्रवार दि.28 जुलै 2023 रोजी यावल नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग यांची भेट घेऊन यावल नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार थांबवण्याची मागणी केली.[ads id="ads1"] 

         दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल नगरपालीकेमध्ये २९ डिसेंबर २०२१ पासुन प्रशासक नियुक्त झाले असुन १९ महीन्यापासुन प्रशासक कार्यरत आहे.आपण प्रशासक असुन आपणाकडे विभागातील ४ नगरपरीषदांचे प्रशासक म्हणुन पदभार आहे व आपण फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी असल्याने पुर्ण वेळ न.पा ला देऊ शकत नाही हे आम्ही समजुन आहोत तसेच यावल न.पा.त नियमित मुख्याधिकारी नसल्याने चोपडा येथील मुख्याधिकारीनिकम यांच्याकडे पदभार देण्यात आलेला आहे ते यावल येथे नियमित येत नसल्याने नगरपरीषदेच्या कामकाजामध्ये खोळंबा होत असुन अनागोंदी माजलेली आहे.मुख्याधिकारी उपस्थित रहात नसलयाने यावल शहर वा-यावर सोडल्याचे दिसत आहे. न.प बाबतीत विविध समस्यांबाबत विभाग प्रमुख यांना प्रत्यक्ष भेटुन अवगत करुन देखील कामे होत नसल्याने नागरीकांचा यावल न.प वर रोष आहे.म्हणुन आपण स्वतः लक्ष घालुन खालील मागण्या संबंधीत विभाग प्रमुख यांना सुचित करुन अनागोंदी कारभार थांबविण्यास मदत करावी अशी आमची मागणी आहे.[ads id="ads2"] 

     चोपडा येथील प्रभारी मुख्याधिकारी यांनी यावल नगरपालीकेत आठड्यातुन किमान दोन दिवस नियमित कार्यालयीन वेळेत हजर रहावे.

मोकाट गुरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.मागील वर्षी मोकाट गुरांमुळे २ ते ३ वेळेस अपघात झालेला असुन २ व्यक्ती मयत झालेल्या आहेत. म्हणुन मोकाट गुरांचा बंदोबस्त करुन त्या मोकाट गुरे मालकांवर देखील कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे.यावल नगरपरीषदेच्या साठवण तलावात पुरेसा व मुबलक पाणी साठा उपलब्ध असुन देखिल काहीही कारण नसतांना ३ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईची झळ नागरीकांना पोहचत आहे. म्हणुन पाणी पुरवठा २ दिवसाआड करावा अशी आमची मागणी आहे.यावल शहरात होणारा पाणी पुरवठा हतनूर धरणाच्या पाटचारीतून होतो.पाटचारीतुन पाणी

न.पा.च्या साठवण तलावामध्ये येते तेथुन पाणी जलशुध्दीतुन शहराला दिले जाते.पाण्याची निकड लक्षात घेता साठवण क्षमता वाढविण्यासाठी न.पा.ने अतिरीक्त साठवण तलाव बांधलेला असुन तो गेल्या २ वर्षापासुन इनलेट/आऊटलेटचे काम न झाल्याने विनावापर पडुन आहे.इनलेटचे काम व्हावे म्हणुन जिल्हाधिकारी जळगाव

यांनी सुमारे एक वर्षापुर्वी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे व नगरपरीषदेने टेंडर

करुन ८/९ महीने होऊन देखिल मुख्याधिकारी यांनी आजपर्यंत वर्क ऑर्डर दिलेली

नाही.अतिरीक्त साठवण तलावाबाबत मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे जनहीत याचीका दाखल आहे असे कारण देऊन मुख्याधिकारी विकास कामांध्ये अडथळा निर्माण करत आहे. वास्तविक पाहता न्यायालयाने कुठलाही स्थगीती आदेश किंवा

स्टेटॅस्को दिलेला नसतांना काम अडविले जात आहे.पर्यायी नागरीकांच्या सोईसाठी

सुमारे २ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या अतीरीक्त साठवण तलाव विनावापर पडुन आहे.त्यामुळे इनलेट व आऊटलेटचे काम सुरु करण्याबाबत आदेश त्वरीत काढण्यात यावे अशी आमची मागणी आहे.नगरपालीकेच्या कर वसुली विभागाने सन २०२२-२३ या आर्थीक वर्षात अपेक्षित कर वसुली न केल्याने केलेल्या केंद्र सरकार कडुन दरवर्षी मिळणारा १५ वा वित्त

आयोगाचा निधी सुमारे ३ कोटी रुपये मिळणार नाही.सदर शिर्षकाखालील निधीत

५० टक्के रक्कम शहराच्या मुलभुत विकास कामांसाठी खर्च करता येतो व उर्वरीत ५०

टक्के बंधनकारक कामे करता येतात.न.पा.ने अपेक्षित कर वसुली न केल्याने शहराचे

नुकसान झालेले असुन कर विभागाचा आढावा घेण्यात यावा अशी आमची मागणी

आहे.

      यावल न.पा.ने वैशिष्ठ्यपुर्ण योजनेतून बांधकाम पुर्ण केलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील

गाळे सुमारे ३ ते ४ वर्षापासुन विनावापर पडलेले असुन न.पा.च्या उदासिनतेमुळे

लिलाव करण्यात आलेले नाही. गाळ्यांचा लिलाव झाल्यास न.पा.च्या आर्थीक उत्पन्नात भर पडणार असुन शहरातील बेरोजगारांना व्यवसाय करण्यास मुभा मिळणार आहे. तरी त्वरीत गाळे लिलाव करण्यात यावे अशी आमची मागणी आहे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल कामे संथगतीने सुरु असुन शासनाने ५०७ घरकुल लाभार्थी यांची यादी मंजुर केलेली असुन फक्त १०० च्या जवळपास घरकुल पुर्ण आहेत.

सदर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आढावा बैठक घेवुन गती द्यावी अशी आमची मागणी आहे.तरी सदरील आमच्या मागण्या १५ दिवसाच्या आत त्वरीत पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनाची प्रत माहितीस्तव जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिली.निवेदनावर माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील,राकेश गुरलीघर कोलते,राजेंद्र घनशाम फालक,धीरज प्रकाश महाजन,माजी नगरसेवक समीर बशीर मोमीन,शेख असलम शेखनबी यांच्यासह किशोर सुरेश माळी नरेंद्र नत्थु शिंदे,फारुख शेख, युसूफ मोमीन,चंदन विलास फेगडे,एजाज नियाजोद्दिन देशमुख,यशवंत गोविंद जासुद,प्रभाकर बारी.यांची स्वाक्षरी आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!