यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल पंचायत समिती आवारात गेल्या दिनांक :- 14/08/2023 पासुन सावखेडा सिम ग्रामपंचायतिने केलेल्या अपहर प्रकरणी माजी पंचायत समिती सदस्य तथा माझी पंचायत समिती गटनेते शेखर सोपान पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. त्यामुळे आज 9 व्या दिवशीही आपण उपोषण सुरूच असल्याने अधिकारी वर्गाने आमरण उपोषण बसणारे कर्ते शेखर पाटील व त्यांच्या सहकारी यांच्या कडे प्रशासन वर्गकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे आज भुसावळ बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गांवर माजी पंचायत समिती गट नेते व त्यांच्या आमरण उपोषणास शासनाने दाखल घ्यावी यासाठी तब्बल 3 तास रस्ता रोको ठिय्या आंदोलन भारतीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाच्या, तसेच निळे निशाण संघटच्या व सावखेडा सिम येथिक ग्रामस्थ यावल तालुक्यातील शेखर पाटील यांच्या वर प्रेम करणारे ग्रामस्थांनी केल्याने जळगांव जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील,यावल तहसीलदार माझीरकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग अजय चौधरी,यांनी उपोषणाची दखल घेत माजी पंचायत समिती गट नेते शेखर पाटील व त्यांच्या सहकारी सावखेडा सिम येथिल ग्रामस्थांना लेखी पत्र देऊन अखेर आमरण उपोषण सोडविले.[ads id="ads1"]
यावल तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अपहार व भष्ट्राचार केलेल्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्र लेखी स्वरूपात नमूद केल्या नंतर माजी पंचायत समिती गटनेते शेखर पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मागे घेतले .[ads id="ads2"]
यावेळी यावल रावेर तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे,धनंजय चौधरी यावल शहर भारतीय काँग्रेस चे शहर अध्यक्ष कदीर खान, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकेश येवले, उद्धव गटाचे तालुका अध्यक्ष रविंद्र सोनवणे,काँग्रेस चे अनुसूचित यावल तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष पवन पाटील,वकील देवकांत पाटील,काँग्रेस चे अमोल भिरूड,निळे निशाण संघटनेचे लक्ष्मी ताई भालेराव, अशोक तायडे,यांच्यासह सावखेडा सिम येथिल ग्रामस्थ, भारतीय काँग्रेस चे यावल व जिल्हातील पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस व युवक चे अधिकारी व पदाधिकारी, उद्धव गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, निळे निशाण चे अधिकारी व पदाधिकारी, यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.



