यावल नगरपरिषद प्रशासक, मुख्याधिकारी यांच्या नाकावर टिचून बेकायदा मटन विक्री दुकान
यावल ( सुरेश पाटील )
यावल भुसावल रोडवर यावल नगरपरिषद हद्दीत श्री स्वामी समर्थ मंदिर व श्री स्वामीनारायण मंदिरापासून काही अंतरावरच मुख्य रस्त्याच्या बाजूला पक्के पत्री शेड उभारून ते पत्री शेडचे दुकान मासिक भाड्याने घेऊन मटन विक्रीचे दुकान बिनधास्तपणे सुरू केल्याने आजूबाजूच्या रहिवासी नागरिकांसह मंदिरात जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या गंभीर प्रकाराकडे गुरुवार दि.17 ऑगस्ट 2023 रोजी एकूण पाच नागरिकांनी यावल नगरपालिकेकडे लेखी तक्रार केली असून यावल नगरपालिकेने या गंभीर विषयाची,तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्या भागात मोठी अप्रिय घटना घडणार असल्याने दुकान मालक आणि दुकानदाराविरुद्ध यावल नगरपालिकेने तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
यावल नगरपरिषद हद्दीत ठीक ठिकाणी बेकायदा मटन विक्रेते आणि चिकन विक्रेते यांनी आपापली दुकाने यावल नगरपरिषदेची कोणतेही अधिकृत परवानगी न घेता बकरी,बोकड मटन व चिकन सेंटर दुकाने यावल नगरपरिषदेच्या नाकावर टिचून सुरू केली आहे याकडे यावल नगरपरिषद संबंधित विभागासह मुख्याधिकारी आणि प्रशासक तथा प्रांताधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.[ads id="ads2"]
यावल नगरपरिषदेकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, भुसावळ रोडवर गॅस एजन्सी तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर व श्री स्वामीनारायण मंदिरापासून काही अंतरावरच भर रस्त्याच्या बाजूला बिनशेती गट नंबर 708/10 प्लॉटवर दिगंबर जाधव यांचे मालकीचे जागेत पूर्वेस मोकळ्या जागेत दहा बाय दहाचा गाळा ( पत्री शेड ) बांधला असून सदर गाळा हा मटन विक्री करण्यासाठी मोहसीन हारून खाटीक यांना भाड्याने दिला आहे सदर दुकान सुरू करण्यासाठी कोणतीही सरकारी परवानगी न घेता तसेच सदर दुकान सुरू करण्यासाठी आम्हा रहिवाशी यांची कोणतीही संमती किंवा नाहरकत न घेता दादागिरीने जबरदस्तीने मटन विक्री दुकान सुरू केले आहे.
सदर भाडेकरू तथा मटन विक्रेता हा दुकानाचे शेडचे मागील बाजूस बकरी व कोंबडे कापत असतो, त्याचे रक्त सर्व दूर उडत असते त्या मासापासून दुर्गंधी येते त्यामुळे आम्ही आजूबाजूचे रहिवासी यांना त्रास होत आहे तसेच आमचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे तसेच सदरच्या भाडेकरूमुळे बेकायदा मटन विक्रीमुळे कायदा व सुव्यवस्था,जातीय सलोखा डोक्यात येऊ शकतो आणि भविष्यात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारे दिलेल्या तक्रार अर्जावर,निवेदनावर रितेश अशोक बारी,खुशाल पंढरीनाथ चौधरी,हर्षा विजय जंगले, प्रवीण जगन्नाथ चौधरी,मनोहर कडू पाटील यांनी आपली स्वाक्षरी करून यावल नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले तरी मुख्याधिकारी आणि प्रशासक तात्काळ काही कारवाई करणार आहे किंवा नाही..? याकडे सर्व यावलकरांचे लक्ष वेधून आहे.


