5 % निधी व मालमत्ता करातून सूट मिळणे साठी प्रहार दिव्यांग संघटनेचे 15 ऑगस्ट रोजी उपोषण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) यावल शहरातील व तालुक्यातील दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी आणि मालमत्ता करातून सूट मिळण्यासाठी यावल पंचायत समिती समोर मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी शासनाचे व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे उपोषण करणार आहे.[ads id="ads1"] 

            यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवंना सन २०१८ ते २०२३ या कालावधीतील ५% निधी मिळून मालमत्ता करातून ५०% सूट मिळावी यासह इतर मागण्या शासन आदेशानुसार त्वरित मंजूर होऊन सुविधा मिळाव्यात व त्यांना पुनर्वसन व विकासाची संधी दयावी अशी निवेदने यावल ता. प्रहार दिव्यांग क्रांती संघटने मार्फत दि.२८/०२/२०२३,०३/०५/२०२३,१९/०५/२०२३, २०/०७/२०२३ रोजी देणेत आली आहे परंतू ५ महिन्या पासून दिव्यांग बांधव सुविधा मिळणेची प्रतीक्षा करीत आहे. परंतू शासन आदेशा नुसार पंचायत समिती यावल कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही न होता.उदासिनता दाखवली जात आहे.[ads id="ads2"] 

  दिव्यांग बांधव शासन सुविधांपासून वंचित रहात असून त्यांना निराशामय जीवन जगावे लागते आहे.व पंचायत समिती यावल कार्यालयाकडून शासनाचे दिव्यांग / पुनर्वसन विकास कार्यक्रमास सोईस्कर पणे दुर्लक्ष होत आहे.व सुमारे ५ महिन्या पासून दिव्यांगाचे निवेदनाचे कमीत कमी उत्तर देणेचेही पंचायत समिती कडून सौजन्य दाखवणेत आले नाही. हि अत्यंत खेदाची बाब आहे.

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय  जळगाव यांचेकडून जा.नं. ११८ दि. २३/०३/२०२३ चे लेखी आदेशानुसार यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगांचे शासन निर्णया नुसार सर्वेक्षण करून ५% निधी वितरीत करणेची कार्यवाही करून २० दिवसात अहवाल पाठवावा असे आदेश पंचायत समिती यावलकडे येवूनही त्याची काही एक दखल न घेता सदर आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.

       त्यामुळे ५ महिन्यापासून मागणी करित असलेल्या मागण्या त्वरित मंजुरी होऊन सुविधा मिळणेसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुक्याचे वतीने उत्तर महाराष्ट्र प्रहार जनशक्ती अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेशदादा चिंधू पाटील तालुका अध्यक्ष

गोकुळभाऊ कोळी प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष

नंदकिशोर सोनवणे शहर अध्यक्ष माजी नगर अध्यक्ष

तुकाराम बारी माजी नगर अध्यक्ष अभिमन्यू विश्वनाथ चौधरी प्रहार सेवक मनोज करणकर यांचे प्रमुख उपस्थितीत प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा उपाध्यक्ष  दिनेश भाऊ सैमीरे यांचे नेतृवा खाली दि.१५/०८/२०२३ रोजी यावल पंचायत समिती कार्यालया समोर सकाळी १० ते ६ या वेळेत यावल शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधव १ दिवसाचे लाक्षणीक उपोषणास बसणार आहेत.उपोषण स्थळी दिव्यांगांचे आरोग्याची व उपोषणाची जबाबदारी पंचायत समिती व प्रशासनाची राहील. असे दिलेल्या निवेदनात नमूद केले असून त्याच्या प्रती आ. बच्चूभाऊ कडू,आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे, तहसीलदार यावल,पोलीस निरीक्षक यावल इ. ठिकाणी दिल्या असून आपले न्याय हक्कासठी  परिसरातील दिव्यांग बांधवांनी उपोषणामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील,जिल्हा सल्लागार राजमलदादा वाघ, तालुका अध्यक्ष,मोहन सोनार, उपाध्यक्ष,प्रदीप माळी,राहुल सावखेडकर,सुकलाल धंजे, उत्तम कानडे,जनार्दन फेगडे, ॲड.गोविंद बारी,प्रवीण सोनवणे यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!