यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील साकळी येथे भडगाव येथिल गोंडगावची चुमुकली कुमारी कल्याणी संजय पाटील यांची क्रूर पणे अत्याचार करून हत्या करण्यात आली अश्या या चुमुकली ला साकळी येथिल हनुमान पेठ वासियांन तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.[ads id="ads1"]
तालुक्यातील साकळी या गावी गोंडगाव येथिल येथिल कुमारी कल्याणी संजय पाटील या लहान मुलींची क्रूर पणे अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी व चिमुकली कल्याणी हिला न्याय मिळावा त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला या साठी सर्व धर्मीय लोकांना कडून मागणी केली जात असुन साकळी या गावात हनुमान पेठ येथिल रहिवाशी यांच्या कडून कॅॅंडल मार्च कढून कुमारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. [ads id="ads1"]
यावेळी हनुमान पेठ येथिल महिला भगिनी व पुरुष मंडळी लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसेच उद्या दिनांक :- 08/08/2023 मंगळवार रोजी यावल येथे चिमुकली कुमारी कै. कल्याणी हिला न्याय मिळावा यासाठी जिनींग प्रेस यावल येथून ते तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज व सर्व धर्मीयांन कडून करण्यात आले आहे.



