यावल (फिरोज तडवी)
यावल रावेर चोपडा या सारख्य घनदाट अभय अरण्यातील जल- जंगल -जमिनीचे रक्षण करणाऱ्या आदिवासींच्या संस्कृतीचे जतन अस्मिता कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांच्या आवश्यकता लक्षात घेऊन हा दिवस साजरा करण्यात येतो संवर्धन केले जावे.त्यांची अस्मिता व आत्मसन्मान जपला जावा राहावी म्हणून संयुक्त राष्ट्र संघ युनो च्य २३ डिसेंबर १९९४ च्या आमसभेत पारित झालेल्या ठरावा नुसार 9 ऑगस्ट १९९५ ला पहिला जागतीक आदिवासी साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
१९९३ हे जागतीक आदिवासी वर्ष घोषीत केल्या प्रमाणे संपूर्ण विश्वात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आदिवासी तडवी भिल जमात उत्सव समिती यावलच्या वतीने यावर्षीही बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य रॅलीचे आयोजन यावल शहरात करण्यात आलेले आहे. [ads id="ads2"]
माननीय आमदार श्री शिरीष दादा चौधरी(रावेर विधानसभा) यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता यावल शहरातील तडवी कॉलनी येथे महापुरुषांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून भव्य रॅलीचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमास जिल्हा एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी श्री अरुण पवार, यावल च्या तहसीलदार श्रीमती मोहन मला नाझीरकर, पोलीस निरीक्षक श्री राकेश माणगावकर, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मंजुषा गायकवाड आणि विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित राहतील. या रॅलीत आदिवासी संस्कृती दर्शन अंतर्गत सजीव देखावे, आदिवासी खेळांचे प्रकार, आदिवासी नृत्य व गायन वादन यांचा सुंदर प्रदर्शन करण्यात येईल. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत रॅलीचा समारोप धनश्री टॉकीज येथे होईल. दुपारी १२ वाजता धनश्री टॉकीज येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ.नजमाताई तडवी (नगराध्यक्ष,मुक्ताईनगर), कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्रीमती रक्षाताई खडसे (खासदार रावेर लोकसभा)तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा .श्री शिरीषदादा चौधरी. (आमदार रावेर) मा. मंगेश दादा चव्हाण (आमदार,चाळीसगाव) मा. श्री.आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव) मा. श्री.कैलास कडलग (प्रांताधिकारी ,फैजपूर), मा. श्री.अरुण पवार( प्रकल्प अधिकारी,यावल),मा.सौ.मोहन मला नाझिरकर( तहसीलदार यावल ),मा.श्री.राकेश माणगावकर( पोलीस निरीक्षक यावल) आणि जिल्ह्यातील सन्माननीय आजी-माजी सरपंच, पसं सदस्य, जि प सदस्य, नगरसेवक, सर्व समाज बांधव अधिकारी, कर्मचारी व समाजसेवक उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासी तडवी भिल समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी तडवी भिल जमात उत्सव समिती यावल च्या वतीने करण्यात येत आहे.