परवानगी नाकारली असताना,जमावबंदी आदेश असताना रास्ता रोको आंदोलन केल्याने 61 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


महाविकास आघाडीचे तालुकास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते माजी लोकप्रतिनिधीचा समावेश

सुमारे साडेचार तास शासकीय यंत्रणेला,जनतेला वेठीस धरण्याचा परिणाम

यावल  (सुरेश पाटील)

चार चाकी व दुचाकी वाहनांचा व त्या वाहनांवरील नागरिकांचा रस्ता अडवून सर्वसामान्य नागरिक जनता तसेच येणारे जाणारे दुचाकी व चार चाकी वाहनांच्या वाहतुकीला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि यावल पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी नाकारली असताना सुद्धा दिनांक 21 रोजी यावल येथे भुसावळ टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन सकाळी 11:45 वाजेपासून सुमारे साडेचार वाजेपर्यंत आंदोलन केल्याने आंदोलनाची परवानगी मागणार उस्मान रमजान तडवी राहणार सावखेडा सिम तालुका यावल यांच्यासह यावल तालुक्यातील काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, आणि काही नागरिक यांच्यासह 61 जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला माधवी कलम 341 143 188 मुंबई पोलीस अॅक्ट 37 ( 1 )   ( 3 )  उल्लंघन 135 प्रमाणे पोलीस शिपाई सुशील घुगे यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला.यामुळे यावल तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.[ads id="ads1"] 

       सोमवार दि.20 रोजी अर्जदार उस्मान रमजान तडवी, रा. सावखेडासीम, ता. यावल यांनी शेखर सोपान पाटील यांनी सावखेडासीम तालुका यावल येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होवून संबंधीतांवर कारवाई करणे बाबत दि.14 ऑगस्ट 2023 रोजी पासुन सुरु केलेल्या आमरण उपोषणाची अद्यापपावेतो दखल घेण्यासाठी कोणीही अधिकारी आलेले नाहीत.तसेच तालुक्यातील अधिकारी देखील दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे जो पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव आमच्या समस्या ऐकुण घेण्यासाठी येणार नाहीत तो पर्यंत सोमवार दि. 21 रोजी 11.00 वाजता भुसावळ टि पॉईन्ट येथे रास्तारोको करण्याचे ठरविले आहे व त्यांस परवानगी मिळावी म्हणुन उस्मान रमजान तडवी रा. सावखेडासीम,ता.यावल व ईतर 32 जणांची स्वाक्षरी असलेला अर्ज यावल पोलीस स्टेशन येथे सादर केला.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे कार्यालय,जळगांव (गृह शाखा),क्र./दंडप्र/कावि/2023/02/519 दि. 07/08/2023 नुसार जळगांव जिल्ह्यात दि.7  ते दि. 21/08/2023 वाजेपावेतो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार प्रतिबंधात्मक व जमाव बंदी आदेश लागु असल्याने सदर आदेशाच्या अधीन राहुन यावल पोलीस स्टेशन गोपनिय जा.क्र. 354/2023 दि. 20/08/2023 अन्वये अर्जदार उस्मान रमजान तडवी, रा. सावखेडासीम. ता. यावल यांना कलम 149 सी.आर.पी.सी. नुसार नोटीस देण्यात आली होती व रास्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.[ads id="ads2"] 

            सोमवार दि. 21 रोजी सकाळी 11.45 वा.चे सुमारास आम्ही दिलेल्या कायदेशिर आदेशांकडे दुर्लक्ष करुन उस्मान रमजान तडवी, रा. सावखेडासीम,व त्यांचे सोबत ईतर 100-150 स्री-पुरुष यांनी अचानक यावल शहरात अंकलेश्वर ते ब-हाणपुर जाणारे रस्त्यावर भुसावळ टि पॉईन्ट येथे जमुन रास्ता रोको केला व सर्व सामान्य नागरिक तसेच येणारे जाणारे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाहतुकीला जाणिवपुर्वक अडथळा निर्माण केला.सदर आंदोलना मध्ये अर्जदार उस्मान रमजान तडवी रा. सावखेडासीम यांचे सोबत 1) पवन युवराज पाटील. रा. विरावली, 2) हर्षल मिलींद महाजन, 3) राहुल बडगुजर, 4) संकेत निवृत्ती किरंगे, राहणार सावखेडा सीन 5) रोहन दिनेश महाजन

महाजन,रा.माहीत नाही, 6) तुषार शिरीष पाटील (रा. माहीत नाही), 7) धिरज प्रभाकर पाटील (रा. माहीत नाही).8) देविदास गोविंदा पाटील,9) निलेश प्रमोद महाजन,10)शाकीर मुबारक तडवी,रा.सावखेडा, 11) अमोल प्रेमचंद पाटील (रा. माहीत नाही).12) दिपक ज्ञानेश्वर चौधरी,13) गिरीष लिलाधर बर्ड,14 ) तुषार खुशाल पाटील, रा.15) कोमल नरेंद पाटील सावखेडासीम,16) सुयोग किरण पाटील (रा. माहीत नाही).17) ताहेर लतीफ तडवी,18)विशाल ज्ञानेश्वर पाटील,19) पराग प्रेमचंद पाटील,20)चंद्रकांत महाजन, 21) गणेश शरद कोल्हे,22 )पवन रामकृष्ण पाटील,23) वसंत राघो पाटील, 24) अल्ताफ ईब्राहीम तडवी,रा. मुलींचे वसतीगृहाच्या / मनुदेवी मंदीराच्या मागे,यावल, 25) गौरव भरत सोनवणे (रा. माहीत नाही).26) रशीद रसुल तडवी,27 ) सलिम बि-हाम तडवी, 28) मुकुंदा शांताराम पाटील (रा. माहीत नाही),29) किरण पाटील (पुर्ण नांव गांव माहीत नाही),30) वासुदेव पाटील (पुर्ण नांव गांव माहीत नाही), 31) विकी पाटील, 32) प्रभाकर नारायण सोनवणे,रा. वढोदा, ता. यावल,33) मुकेश पोपटराव येवले, रा. शिवाजीनगर, यावल,34) राकेश मुरलीधर कोलते, रा. महाजनगल्ली, यावल, 35) कदीर खान करीम खान, रा. काझीपुरा,यावल, 36) अनिल जंजाळे, रा. सिद्धार्थ नगर, यावल, 37 ) संतोष बन्सी धोबी, यावल,38 )बापु जासुद, रा. यावल, 39) विक्की विजय गजरे, रा.यावल, 40 )अजय बाळु अडकमोल, रा. दहीगांव, ता. यावल, 41) विकास गणेश पाटील, रा. सांगवी खु।।, ता.यावल, 42) अनिल प्रल्हाद पाटील, रा. कोळवद, ता. यावल 43) सुनिल भालेराव, रा. सावखेडासिम, 44 )राजु महाजन, रा. यावल, 45) धिरज प्रेमचंद कुरकुरे,रा. सातोद, ता. यावल,46) उमेश जावळे, रा. कोरपावली, ता.यावल, 47) राजेश करांडे, रा.यावल, 48 ) शरद रंगु कोळी,रा. यावल, 49) कामराज रुपचंद घारु. रा. यावल, 50 ) खुशाल दिलीप पाटील, रा. बोरावल गेट, यावल,51) ईम्राण पहीलवान, रा. यावल,52) चंद्रकांत जंगले, रा. चितोडा, ता.यावल,53) डॉ. विवेक अडकमोल, रा. बोरावल गेट, यावल,54) सुनिल (पप्पु) जोशी, रा. शनि मंदीर, यावल, 55 )विलास तायडे, निळे निशाण, रा. यावल,56) ललीत पाटील,रा. दहीगांव, ता. यावल,57) रहेमान खाटीक, रा. खाटीकवाडा, यावल,58) नईम शेख, रा. यावल, 59 ) कडु पाटील, चितोडा, ता. यावल, 60) जितेंद्र वरडे, रा. सावखेडासिम, ता.यावल,61) रविंद्र पोलाद सोनवणे, रा. वढोदा,ता.यावल अशांनी यांनी अचानक यावल शहरात अंकलेश्वर ते ब-हाणपुर जाणारे रस्त्यावर भुसावळ टि पॉईन्ट येथे मध्यभागी थांबुन येणारे जाणारे चारचाकी व दुचाकी वाहनांचा व त्या वाहनांवरील नागरीकांचा रस्ता अडवून सर्व सामान्य नागरिक तसेच येणारे जाणारे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाहतुकीला जाणिवपुर्वक अडथळा निर्माण केला तसेच जिल्हाधिकारी यांनी जमाव बंदी आदेश निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन  त्यांचे विरुध्द भादवि कलम 341,143,188 मुंबई पोलीस ॲक्ट 37 (1),(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.

  -----------------------------------------------

तालुकास्तरीय महत्त्वाचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधीचा समावेश.

रस्ता रोको आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा प्राध्यापक मुकेश येवले,यावल नगरपरिषद माजी प्रभारी अध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील, उद्धव ठाकरे शिवसेना गटातील काही पदाधिकारी कार्यकर्ते तालुक्यातील व शहरातील काही पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

----------------------------------------

------------------------------------------


यावल पोलिसांची सहनशीलता कौतुकास्पद गुन्हा दाखल केल्याने सर्वस्तरातून कौतुक.


काल सोमवार दि. 21 रोजी सकाळी 11:45 ते दुपारी 16:45 पर्यंत म्हणजे सुमारे पाच तास रास्ता रोको आंदोलन झाले.या रास्ता रोको आंदोलनामुळे यावल शहरातील व तालुक्यातील सर्व स्तरातील जनतेला विद्यार्थ्यांना आप - आपल्या लहान मोठ्या उद्योगात,व्यवसायात,आणि दैनंदिन कामकाजात, कामधंद्यात रस्ता रोको आंदोलनामुळे सुमारे चार ते साडेचार तास एवढ्या मोठ्या कालावधी पर्यंत मोठा अडथळा निर्माण झाला.पोलिसांना सुद्धा सहनशीलता बाळगून बंदोबस्त चोख ठेवावा लागला.विरोधी व सत्ताधारी राजकारणातून पोलिसांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आणि या सहनशीलतेचा अंत संपूर्ण जनतेने बघितला होता आणि आहे शेवट गुन्हा दाखल झाल्याने यावल पोलिसांबाबत जनतेत ( राजकारणात नव्हे..! ) समाधानकारकरीत्या, कौतुकास्पद बोलले जात आहे.

------------------------------------------------------

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!