सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलीस स्टेशन लोहारा दूरक्षेत्र( बीट)चे पोलीस युसुफ अमीर तडवी यांची दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती झाली. त्यानिमित्त सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पो.उपनि.विनोद खांडबहाले व सहकाऱ्यांनी त्यांना बॅच लावून त्यांचे अभिनंदन केले.[ads id="ads1"]
लोहारा दूरक्षेत्र(बीट)चे युसुफ अमीर तडवी हे १९९३ मध्ये पोलीस सेवेत भरती झाले.१९९४ ते १९९८ पोलीस शिपाई पोलीस मुख्यालय जळगाव,१९९८ ते २००३ चाळीसगाव पोलीस स्टेशन,२००३ ते २०१२ भुसावळ शहर पोलीस स्टेशन,२०१२ ते २०१८ भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन पोलीस नामदार व २०१८पासून ते आज पावेतो सावदा पोलीस स्टेशन येथे ते कार्यरत आहे.तसेच लोहारा, सावखेडा,खिरोदा,गौरखेडा, कुंभारखेडा व रोझोदा व परिसरातील गावांमध्ये त्यांचा चांगला परिचय व सलोख्याचे संबंध असून ते त्यांच्या कामातही दिसून येते.म्हणून त्यांच्या पदोन्नतीमुळे परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


