भुसावळ ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रीय संरक्षण आदरणीय महाउपासिका मीराताई जी आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय एडवोकेट-डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, राष्ट्रीय सल्लागार आदरणीय वंचितांचे आधारस्तंभ एडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,यांच्या आदेशान्वये, जिल्हा शाखेच्या आदेशाने खालील प्रमाणे नियोजन करून जिल्हा कार्यकारणीच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली.[ads id="ads1"]
आज दिनांक 20/08/2023 रविवारी दुपारी बारा ते दोन या कालावधीत शीलरत्न बुद्ध विहार चांदमारी चाळ भुसावळ या ठिकाणी बैठक संपन्न झाली,त्यात सर्वच तालुक्यातील आजी-माजी अधिकारी, पदाअधिकारी, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, समता सैनिक दलाचे वरिष्ठ पदाधिकारी, तथा जिल्हा कार्यकारणीतील महिलावर्ग, त्याचप्रमाणे शहरातील, तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. [ads id="ads2"]
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्र वानखेडे गुरुजी, सरचिटणीस आदरणीय आनंद ढीवरे सर प्राध्यापक, तसेच वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका लताताई अरुण तायडे महिला विभाग संघटक व नाशिक विभाग प्रभारी, सुभाष सपकाळे कार्यालयीन सचिव, जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष प्रियंका ताई अहिरे, केंद्रीय शिक्षिका भालेरावताई जळगाव, तसेच समता सैनिक दलाचे युवराज नरवाडे कर्नल साहेब, मेजर रमेश साळवे, केंद्रीय शिक्षक आद. ए.टी.सुरडकर गुरुजी, केंद्रीय शिक्षक आद. प्रकाश सरदार गुरुजी, आद.तालुका अध्यक्ष प्रवीण डांगे, सुरेश जोहरे, धम्म मित्र आनंद सपकाळे, बौद्धाचार्य कैलास सपकाळे, कार्यालयीन अध्यक्ष सुभाष सपकाळे, श्रावण साळुंखे गुरुजी, पी.एम. डोंगरे साहेब, राजेंद्र अडकमोल, चंद्रकांत वाघ, राजाराम प्रधान, राहुल वाघ, तसेच कपिल वस्तू नगरी येथील समता सैनिक दलाचे सैनिक,व उत्तम चिंधू सुरवाडे, रंधेभाऊ बौद्धाचार्य नशिराबाद, त्याचप्रमाणे सोनवणे भाऊ नशिराबाद, तसेच परिसरातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ता गणेश प्रसंगी उपस्थित होते. जिल्हा कार्यकारणीच्या विचार विनिमया अंती या ठिकाणी खालील प्रमाणे निवड करण्यात आली त्यात आद.उत्तम चिंधु सुरवाडे तालुका अध्यक्ष भुसावळ, अरुण गंभीर तायडे सरचिटणीस भुसावळ तालुका {केंद्रीय शिक्षक}, त्याच प्रमाणे कैलास सपकाळे (बौद्धाचार्य) कोषाध्यक्ष, अशी सर्वानुमते निवड करण्यात येऊन बरीच पदे या ठिकाणी निवडून भरण्यात आली. व उर्वरित पदे ही नंतर तालुका अध्यक्ष आणि त्यांची कार्य करनी ने निवड करण्यात यावी जिल्हा शाखेने आदेश दिला. त्याप्रमाणे पुढील पदनिवडीची प्रक्रिया होईल, आणि उर्वरित पदे भरले जातील शेवटी शुभेच्छा पर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष रवींद्र वानखेडे, जिल्हा सरचिटणीस आनंद ढिवरे सर, त्याचप्रमाणे लताताई तायडे वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका. यांनी शुभेच्छा पर मुत्तर कार्यकारणीस मार्गदर्शन केले. चहापाना नंतर कार्यक्रम संपन्न झाला. सारणतय झाल्यानंतर समारोप झाला आणि उपस्थितांचे विशेष आभार प्रवीण डांगे यांच्याकडून मानण्यात आले.



