2 ट्रक सह 12 लाख 21 हजार रुपयांचा आडजात लाकूड जप्त ;यावल तालुक्यात यावल वन विभागाची कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

2 ट्रक सह 12 लाख 21 हजार रुपयांचा सागवान जप्त ;यावल तालुक्यात यावल वन विभागाची कारवाई

यावल ( सुरेश पाटील)

आज दि.14 रोजी  दुपारी 16:00 ते 18:00  वाजेचे सुमारास उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांचेकडून मिळालेल्या गुप्त बातमी वरून यावल् ते किनगाव्  रस्त्याने गस्त करीत असताना चुंचाळे गावाजवळ संशयित वाहन क्रमांक.MH 28 B 8543   याचा अटकाव करून वाहनाची तपासणी केली असता अवैध बिनापासी लाकूड तसेच यावल- ते हरिपुरा रस्त्याने गस्त करित असताना वाहन क्र. HR- 47 B 0672 वाहनात अवैध्  लाकूड भरलेले दिसले वाहन चालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. प्रथदर्शनी वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन  शासकीय आगार यावल येथे आणून ताबा पावतीने जमा  केले. [ads id="ads1"]    

 1) इमारती लाकूड अंदाजे 13.000 घ.मी.मा.16100 किंमत रुपये. व जप्त वाहन क्र.MH -28 B 8543  ट्रक किंमत अंदाजे 7,00,000 रुपये एवढा आहे. प्रकरणी व्. र्.निंबादेवी  यांनी प्र. रि. क्र. 11/2023 दि.11 रोजी जारी केला वाहन चालक जियाफतआली नजाफतआली रा.सुरत गुजरात                                                             2) पंचरस जळवू लाकूड अंदाजे 4:00 घ. मी. 4500 किंमत रुपये व जप्त वाहन क्र. HR-47 B 0672 माल ट्रक किंमत 5,00,000 रुपये एवढा आहे. प्रकरणी व. र. हरिपूरा यांनी प्र री. क्र. 08/2023 दि. 11/08/2023 जरी केला. आरोपी वाहन चालक जब्बार् बेग सत्तरबेग रा. बऱ्हानपूर  मध्यप्रदेश सदर दोन्हीं गुन्हे प्रकणावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2)ब, 42, 52 अन्वये.  गुन्हा नोंदविला आहे. सदर कार्यवाहीत वनक्षेत्रपाल यावल पुर्व  व् स्टाफ तसेच् वनक्षेत्रपाल यावल प.व स्टाफ यांनी सहभाग घेतला.[ads id="ads2"] 

सदर कार्यवाही ही ऋषिकेश रंजन वनसंरक्षक धुळे जमीर शेख,उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल,यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यावल पश्चिम सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व अजय बावणे,वनपाल अतुल तायडे, रवींद्र तायडे इत्यादी वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!