15 आगस्ट दिनी कुसुंबे खु येथे धरणे आंदोलन ; प्रदिप सपकाळे ग्रा प .सदस्य तथा जि.उपाअध्यक्ष ब.स.पा.यांनी तहसीलदार रावेर यांना दिले निवदेन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


कुसुंबा ता.रावेर प्रतिनिधी ( चांगो भालेराव) : ग्रामपंचायत सदस्य कुसुंबा खुर्द तथा जि. उपाध्यक्ष प्रदीप सपकाळे यांचे कुसुंबा खुर्द येथे तिरंग्या झेंड्याखाली बसून पुल बांधून मिळावा व स्वस्त राशन मिळावे यासाठी बेमुदत धरणे आंदोलन. कुसुंबे खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालया पासून ते जि प प्राथमीक शाळा कुसुंबे बुद्रुक या दोघं गावच्या मधील लोकांना व विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी जुना पाईप टाकलेला पुल होता. [ads id="ads1"] 

  परंतु सदर पूल हा सन 200६ पासून पावसाचे पाण्यामुळे वाहून गेला असून सदर पुल बांधकाम करून मिळण्यासाठी म.आमदार शिरीष दादा चौधरी विधान क्षेत्र रावेर यांचे कडे बऱ्याच वेळा मागणी केली गेली होती व म. आमदार यांनी देखील निवडून आल्यावर या फुलाचे बांधकामासाठी उद्घाटन करून निधी दहा लाख मंजूर देखील केल्याचे कुसुंबे गावकऱ्यांचे गावकरी यांना आश्वासन दिले गेले होते. [ads id="ads2"] 

  परंतु बऱ्याच वेळा आश्वासने ही खोटी ठरलेली असून शेवटी आता देखील यह आजादी झुटी है देश की जनता भुकी है अशा अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा ची आठवण देत दिनांक १५/८/२०२३ रोजी कुसुंबा खुर्द यांनी ध्वजारोहण केलेल्या तिरंग्या झेंड्या खाली कुसुंबे खुर्द या आदिवासी गावातील सर्व नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राशन मिळावे व कुसुंबे खुर्द येथील शाळेत जाण्याचा पूल तात्काळ शासनाने बांधून द्यावा या मागणीसाठी . प्रदीप भीमराव सपकाळे ग्राफ सदस्य कुसुंबा खुर्द तथा जिल्हा उपाध्यक्ष ब. स.पा .यांनी रात्र दिवस बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे असे निवेदन म.तहसीलदार रावेर यांना दिनांक २६/८/ २०२३ रोजी देण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!