रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
आज दिनांक 15 /08/2023 या रोजी निंबोल तालुका रावेर येथे जि .प.मराठी शाळा तसेच ग्रामपंचायत येथे 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम शांततेत पार पडला.[ads id="ads1"]
प्रथम ग्रामपंचायत मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम सरपंच ताई वंदना संजय पाटील यांच्या हस्ते घेण्यात आला त्यानंतर ध्वजारोहण सुद्धा त्यांच्या हस्ते करण्यात आले. आणि राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत येथे प्रभारी ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे ग्रामसभा रद्द करण्यात आली. पुढील ग्रामसभा 18 /08 /2023 या रोजी होणार आहे असे स्पष्ट केले केले आहे. ग्रामसभा होईल किंवा नाही याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहेत. ग्रामपंचायत येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर पुढे जि प मराठी शाळा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आणि राष्ट्रगीताचा कार्यक्रम घेण्यात आला.[ads id="ads2"]
नवीन निंबोल येथील मनोज दगडू कोळी यांची मुलगी इयत्ता 2 री. मधील प्राची मनोज कोळी या मुलीने राष्ट्रध्वजावर सुंदर असे मनोगत व्यक्त केले होते. मनोगत व्यक्त झाल्यावर आणि टाळ्यांचा गडगडात करून या मुलीच्या अभिनंदन केले.
त्या ठिकाणी उपस्थित सरपंच वंदना पाटील उपसरपंच अशोक पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य मुख्याध्यापक रमेश वानखेडे.विनायक गुरुजी,जिजाबराव पाटिल गुरुजी, शिक्षिका वैशाली सोनवणे शिक्षिका कल्पना पाटील मराबाई पाटील. प्रहार संघटना तालुकाध्यक्ष विनोद कोळी. धीरज धनगर. तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक तेथे उपस्थित होते.

