सावखेडा सिम येथिल ग्रामपंचायतिने केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आमरण उपोषण कर्ते यांची दखल घ्या तहसीलदार यांना निवेदन सादर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे ग्रामपंचायत मध्ये विविध शासकीय योजनांचा बॅट्याबोळ करून भष्ट्राचार केल्या मुळे सावखेडा सिम येथिल रहिवाशी माजी पंचायत समिती सदस्य तथा यावल पंचायत समिती गट नेता शेखर सोपान पाटील यांनी ग्रामपंचायत सावखेडा सिम मध्ये सरपंच ग्रामसेवक,यांच्या मनमानी कारभारामुळे केलेल्या शासकीय योजनेचे तीन तेरा केल्याने वेळोवेळी ग्रामपंचायत मध्ये भष्ट्राचार केल्याचा पाठपुरावा करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी गटविकास अधिकारी यांना लेखी स्वरूपात व तोंडी सूचना करून सुद्या भष्ट्राचार करण्याऱ्यावर कार्यवाही केली नसल्याने माजी पंचायत समिती सद्य व पंचायत समिती गटनेता शेखर सोपान पाटील यांनी थेट यावल पंचायत समिती आवारात दिनांक :- 14/08/2023 पासुन आमरण उपोषणास सुरुवात केली असुन आज उपोषणाचा 4 दिवस असतांना सुद्धा त्यांची दाखल पंचायत समिती अधिकारी वर्गा कडून न घेता आज पावेतो भष्ट्राचार करणाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेले नसल्याने आज दिनांक :- 17/08/2023 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, भारतीय काँग्रेस पार्टी, उद्धव ठाकरे गटाच्या वतीने यावल तहसीलदार,व सहाय्यक गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आहे.[ads id="ads1"] 

सदर निवेदनात म्हटले आहे कि, 14 /8/2023 पासून उपोषणास बसलेले काँग्रेसचे पंचायत समिती चे माजी गट नेते शेखर पाटील हे गेल्या चार दिवसापासून यावल पंचायत समितीच्या समोर अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषणास बसले आहे.त्यामुळे त्यांची प्रकृती दररोज खालावत आहे त्यांचे वजन कमी होत आहे असे असतांना भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये एक लोकप्रतिनिधी अन्न पाणी त्याग करून उपोषणाला बसतो. त्यांची दखल प्रशासनाच्या वतीने घेतली जात नाही. अशा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या मुजोर गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीने यावल तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले  व संतप्त जमावाने 3तास ठिय्या आंदोलन केले.[ads id="ads2"] 

   यावेळी राष्ट्रवादी युवक पवन युवराज पाटील काँग्रेसचे सोशल मीडियाचे प्रदेश सरचिटणीस उमेश भाऊ जावळे मोराचे विकास सोसायटी संचालक किरण भाऊ शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष रवींद्र भाऊ सोनवणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष कबीर खान काँग्रेसचे अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे, प्रसन्न महाजन, रोहन महाजन यशवंत पाटील ज्येष्ठ शिवसैनिक, सावखेडा येथिल ग्रामपंचायत सद्य, महिला, व ग्रामस्थ असंख्य कार्यकर्ते यांच्या वतीने आमरण उपोषणास बसलेले माजी पंचायत समिती गट नेते शेखर सोपान पाटील व ग्रामस्थ यांची दखल शासनाने द्यावी अश्या आशायाचे निवेदन देण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!