आमदार शिरीष चौधरी यांच्या आश्वासनानंतर प्रदिप सपकाळे यांचे आंदोलन अखेर मागे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


    कुसुंबा ता.रावेर प्रतिनिधी ( चांगो भालेराव) : आज दि. 19 रोजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र युवा नेते धनंजय चौधरी यांनी रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथील आंदोलनर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व आमदार शिरीष चौधरी यांच्याशी बोलणे करून आंदोलनकर्त्याची व गावकऱ्यांची मागणी मान्य करण्याचे आश्वासन देत सदर आंदोलन आज पाचव्या दिवशी थांबविले.[ads id="ads1"] 

          सविस्तर वुत्त असे कि, रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द व कुसुंबा बुद्रूक या दोन गावांना जोडणाऱ्या व शाळकरी मुलांचा वापराचा पूल बांधण्यात यावा आणि या आदिवासी गावातील सर्व गावकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा यासाठी दि.15 आगास्ट पासुन ब. स. पा. जिल्हा उपाध्यक्ष व ग्राम पंचायत सदस्य प्रदिप सपकाळे हे काही गावकऱ्यासह ग्रा. प. ने ध्वजारोहन केलेल्या झेंड्याखाली बेमुदत धरणे आंदोलनाला बसले होते. व यांना पाठींबा देण्यासाठी गावकऱ्यांनी दी.18 रोजी रस्ता रोको आंदोलन सुध्दा केले होते. आज या आंदलनाचा पाचवां दिवस होता. मात्र सां. बा. विभाग व जि. प. बांधकाम विभाग यांच्या आढमुठे धोरणामुळे या पुलाची कोणाची हे निश्चीत होत नव्हते. आमदार निधीमधून फक्त 10 लाख रुपये निधी प्राप्त झाल्याने एवढा कमी रकमेत सदर पूल बांधणे शक्य नव्हते म्हणून आज त्या निधीमध्ये वाढ करून सदर निधी 20 लाख रुपये करण्यात येईल व सा. बा. विभागमार्फत सदर पूलाचे बांधकाम  हे दिवाळी पर्यंत करून सदर पूलाची देखभाल दुरुस्ती याच विभागामार्फत करण्यात येईल तसेच कार्यकारी अभियंता जी. प. जळगाव यांचेकडून सदर पुल जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी व भगवान बिरासा मुंडा आदिवासी विभागातील रस्ते जोड योजना अंतर्गत प्रस्ताव  वरिष्ठ पातळीवर  दाखल करण्यात आला आहे असे लेखी पत्र उपविभागीय अभियंता जी. प. बांधकाम उपविभाग रावेर यांनी दिले आहे.[ads id="ads2"] 

   तसेच अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाने साढी मा. तहसीलदार सो. यांनी कुसुंबा खुर्द गावासाठी इस्टाक वाढीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर दाखल केला असल्याचे लेखी पत्र दिले असल्याने, मा. धनंजय चौधरी यांचे विनंतीला मान देऊन येत्या दिवाळीपर्यंत पुलाचे बांधकाम सुरू न झाल्यास आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर सर्व गावकऱ्यांचा बहिष्कार टाकण्यात येईल या अटीवर सदर बेमुदत धरणे आंदोलन दिवाळी पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

हेही वाचा:- राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई : जळगावात खळबळ

यावेळी सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच मुकेश पाटील, नारायण घोडके, चागो भालेराव, कडु लालचंद महाजन, जूम्मा हेतु तडवी, गफार नामदार तडवी, रमेश रोशन तडवी, जावेद बिस्मिल्ला तडवी, जलदार दिलदार तडवी, बाजीराव महाजन, गोपाळ नामदेव पाटील, विनोद भालेराव, दिपक सुरेश भालेराव, गोकुळ मुरलीधर भालेराव, किरण महाजन, दिलीप जावळे, संजू जावळे,अझरुद्दीन गणी तडवी यांचे सह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!