शासकीय तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेला रावेर तालुक्यात सुरुवात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


  रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक १८ ऑगस्ट पासून क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना रावेर तालुक्यातील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कुल सावदा येथून सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या या स्पर्धेत फुटबॉल या खेळाची स्पर्धा रंगली.[ads id="ads1"] 

   स्पर्धेच्या सुरुवातीला नवनिर्वाचित तालुका क्रीडा समन्वयक व सरदार जी जी हायस्कुल चे क्रिडाशिक्षक युवराज माळी, डॉ उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कुल चे पर्यवेक्षक मंगला कांबळे, क्रीडा शिक्षक असलम सर, प्रशांत सोनवणे सर, निहाल शेख सर, दीपक जाधव सर, शाहनवाज आली सर व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. [ads id="ads2"] 

    आज रोजी झालेल्या या स्पर्धेत वयोगट १४ व १७ यात डॉ उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कुल, सावदा या संघाने विजेतेपद पटकविले. तर या यशस्वी विद्यार्थ्यांची निवड ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. 

    या सामान्यांसाठी पंच म्हणून तोसीब कुरेशी सर यांनी काम पाहिले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!