ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे ज्ञान गंगोत्री हस्तलिखित मंडळामार्फत हस्तलिखित भित्ती पत्रकांचे उद्घाटन करण्यात आले. महाविदयालयात विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता बरोबर त्यांच्यातील कलागुणांचा विकास व्हावा व त्यांच्यामध्ये वांग्डमय साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी या हेतुने महाविदयालयात ज्ञान गंगोत्री हस्तलिखित भिंती पत्रकांचे उद्घाटन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या हस्ते १७ ऑगस्टला करण्यात आले.[ads id="ads2"]
यात विद्यार्थ्यांचे स्वलिखित मराठी, हिन्दी, इंग्रजी आणि गुर्जर साहित्य तसेच विविध विषय घेऊन लेख, कविता, म्हणी, कहावते, चुटकले निबंध, शेरो-शायरी, घोषवाक्य सुविचार, महावरे इत्यादी साहित्य आपापल्य हस्तक्षरात लिहून आणले. ते साहित्य तपासून योग्य मार्गदर्शन करून त्यात सुधारणा करून त्या साहित्याचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रेखा पी. पाटील, प्रा. डॉ. एम. के. सोनवणे, प्रा. डॉ, पी. आर. गवळी, प्रा. व्ही. एन. रामटेके, प्रा . नरेंद्र मुळे व विद्यार्थी विद्यार्थिनिंचे सहकार्य लाभले. तसेच मयुरी पाटील, मुस्कान पटेल, वैष्णवी मानकर,सीमा गावडे, स्वप्नील अवसरमल या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



