यावल ( सुरेश पाटील )
यावल नगरपालिकेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर शिवाजीनगर,व्यास मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ढापा तुटल्याने दुचाकी,चार चाकी वाहनांसह इतर नागरिकांना येण्या जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे या ठिकाणी चार चाकी गाड्या आणि रिक्षा रस्त्यावरील तुटलेल्या ढाप्यात अडकून वाहनाचे मोठे नुकसान होत आहे तरी यावल नगरपालिकेने या ठिकाणी नवीन ढापा टाकण्याचे बांधकाम तात्काळ करावे अशी शिवाजीनगर मधील व इतर नागरिकांनी यावल नगरपरिषदेकडे मागणी केली आहे आणि ढापा बांधकाम तात्काळ न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.[ads id="ads1"]
आज दि.17ऑगस्ट 2023 रोजी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,शिवाजीनगर मधील मुख्य रस्त्यावरील गटावरील ढापा तुटलेला आहे त्यामुळे तेथुन ये जा करण्यास
नागरीकांना अनेक अडचणी येत आहे.तसेच तो रस्ता यावल येथील लोकांचे श्रध्दास्थान असलेले महर्षी व्यास मंदीर येथे जाण्याचा एकमेव रस्ता असल्याने भावीकांना सुध्दा ये, जा करण्यास अडचणी येत आहे.तसेच तो ढापा तुटलेला असल्याने मोटार सायकल, फोर व्हीलर,रीक्षा,मोठ्या वाहनांचे सुध्दा त्या ठिकाणी टायर फसत आहे व वाहन धारकांना सुध्दा त्रास होत आहे.[ads id="ads2"]
तसेच त्या भागातील शाळेत जाणारे विद्यार्थी,वृध्द व अपंग लोक हे त्याच रस्त्याने वापरत असल्याने त्यांना सुध्दा अनेक अडचणी येत आहे. कालच त्याठिकाणी रीक्षाचा मोठा अपघात होता होता टळला,त्याठिकाणी रीक्षा फसुन गेली व नागरीकांच्या सहकार्याने रीक्षा बाहेर काढण्यात आली.आपण तो ढापा त्वरीत नवीन बांधावा व तेथुन ये,जा करणारे नागरीक, व्यासमंदीरात जाणारे भावीक, शाळेत जाणारे विद्यार्थी,वाहन धारक तेथील रहीवासी यांना होणाऱ्या त्रासापासुन वाचवावे. तसेच तो ढापा आम्ही दिलेल्या निवेदनानंतर ८ ते १० दिवसाच्या आत ढापा न झाल्यास तेथील रहीवांशासमेत न.पा समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा खालील स्वाक्षरी करणाऱ्यांनी नगरपालिकेत दिला आहे.
निवेदनावर नरेंद्र शिंदे, छाया भारंबे,किरण भगत, योगेश वाणी,निलेश चौधरी, प्रदीप पाटील,विशाल पाटील, विकी येवले,योगेश चव्हाण, विजय भगत,घनश्याम सोनवणे,उदयसिंग पाटील, आकाश पाटील,मयूर यादव, पुरुषोत्तम कुंभार,नितीन पाटील,राहुल निंबाळकर,उमेश कोळी,हेमंत कोळी,संतोष कोळी,विशाल कोळी,गौरव भोईटे,निलेश यादव,गणेश भोईटे,मुकेश तेली,योगेश पवार दीपक सोनार,प्रशांत कोळी, यांनी स्वाक्षरी केली आहे यावल नगरपालिका या ढाप्याचे बांधकाम केव्हा करणार याकडे शिवाजीनगर मधील सर्व स्तरातील नागरिकांचे लक्ष वेधून आहे.



.jpg)