यावल (सुरेश पाटील)
यावल तालुक्यात गौण खनिज उत्खनन प्रकरणात आणि अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडून जप्त केलेल्या वाहनांच्या कारवाईत कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या टिपणीनुसार / सोयीनुसार कारवाई होत असल्याने सर्वसामान्य अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
अवैध गौण खनिज वाहन पकडल्यानंतर तहसील किंवा प्रांत कार्यालयातील संबंधित कर्मचारी आपले वरिष्ठ अधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची दिशाभूल करीत अवैध गौण खनिज वाहनधारकांनवर सोयीनुसार कारवाई करण्यासाठी कार्यालयीन अटी शर्तीचा धाक दाखवून आपला हेतू साध्य करतानाचे काही प्रकरणे अवैध गौण खनिज वाहतूकदारांना समजून आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads2"]
जून व जुलै 2023 महिन्यातील वेगवेगळे तीन अवैध गौण खनिज वाहतूक करतानाचे प्रकरणे बघितले असता अर्धा ब्रास वाळू असलेले जप्त ट्रॅक्टर सोडविण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांची नाहरकत मागितली होती आणि आहे.या प्रकरणात संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांची आर्थिक अपेक्षा पूर्ण न केल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे
नाहरकत मागितल्याचे बोलले जात आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात ट्रॅक्टर मध्ये एक ब्रास वाळू असतानाच उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून
नाहरकत मागितलेली नाही.
3 ब्रास डबर असलेले एक डंपर चालक अवैधरीत्या वाहतूक करीत असताना जप्त केलेले असताना सोडताना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची नाहरकत मागितलेली नाही.असे आदेशावरून स्पष्ट दिसून येत आहे.अवैध गौण खनिज वाहतूक दराने संबंधित कर्मचाऱ्याला विश्वासात घेतले नाही तर तो कर्मचारी अशा त्रुटी काढून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याने तालुक्यातील अनेक अवैध खनिज वाहतूकदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याचप्रमाणे अंजाळे शिवारात तापी नदीच्या किनाऱ्यावर गौण खनिज उत्खनन करताना कार्यालयातील एक दोन कर्मचारी यावल तहसीलदार व प्रांताधिकारी यांची दिशाभूल करीत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवून आपले हित साध्य करीत असल्याने गौण खनिजाच्या खाण पट्ट्यातून वाजवीपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन केले जात असून नाममात्र रॉयल्टी भरली जात आहे यावल तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी प्रत्यक्ष गौण खनिज खानपट्ट्यांची पाहणी करून गौण खनिज उत्खननाचे पंचनामे केल्यास फार मोठा महसूल शासनाच्या तिजोरीत भरला जाईल असे गौण खनिज व्यावसायिक,कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये बोलले जात आहे.
तालुक्यात गौण खनिज उत्खनन प्रकरणात ( वाळू वाहतूक नव्हे ) संबंधितांचे हितसंबंध,ओळख परिचय वाढले असल्याने त्याचा विपरीत परिणाम महसूलच्या तिजोरीवर होत असल्याचे महसूल विभागात खांदेपालट होणे आवश्यक झाले आहे असे सुद्धा बोलले जात आहे.


