उपसरपंच यांनी राजीनामा देऊन माजी आमदार यांना दिलेला शब्द पाळला
किनगावात चर्चेला उधाण
यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील किनगाव बु. ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच निवड अडीच वर्षासाठी राहील त्यानंतर इतर सदस्यांना सरपंच,उपसरपंच पद देण्यात येईल असा शब्द माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी इतर सदस्यांना दिला होता आणि आहे. त्यानुसार उपसरपंच लूकमान तडवी यांनी ठरल्याप्रमाणे 12 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला.परंतु ऑगस्ट 2023 हा महिना संपत आल्यावर सुद्धा किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत महिला सरपंच निर्मला संजय पाटील यांनी अद्याप पावतो राजीनामा न दिल्याने किनगावात चर्चेला उधाण आले असून माजी आमदार रमेशदादा चौधरी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना दिलेला शब्द खरा ठरणार किंवा नाही..? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
किनगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती,किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य निवडून आल्यानंतर सुरुवातीचे अडीच वर्ष महिला सरपंच पद म्हणून निर्मला संजय पाटील तसेच उपसरपंच म्हणून लूकमान तडवी यांना देण्याबाबत तसेच 12 ऑगस्ट 2023 नंतर दीड वर्ष कालावधीसाठी सरपंच म्हणून सौ.भारती प्रशांत पाटील,व उपसरपंच म्हणून सौ.आयनुर तडवी यांना देण्यात येईल असा शब्द किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व अंदाजे 400 ते 500 ग्रामस्थांच्या उपस्थितीत एका मीटिंगमध्ये निश्चित करून सर्वांनुमते माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी सदस्यांना व ग्रामस्थांना शब्द दिला होता आणि आहे.[ads id="ads2"]
ठरल्याप्रमाणे विद्यमान महिला सरपंच निर्मला संजय पाटील यांनी सुद्धा 12 ऑगस्ट 2023 रोजी स्वतःहून राजीनामा देणे आवश्यक होता परंतु त्यांनी आज दि. 30 ऑगस्ट 2023 पर्यंत राजीनामा न दिल्यामुळे संपूर्ण किनगाव परिसरात आमदार रमेशदादा चौधरी यांनी ग्रामस्थांना व सदस्यांना दिलेल्या शब्दाचे काय होणार..? आणि याचे विपरीत परिणाम भविष्यात राजकारणात काय उमटणार..? याबाबत ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


