यावल तालुका शिवसेना बैठक मोठया उत्साहात संपन्न :मा.आमदर प्रा.चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात खुल्या जागेवर भव्य मंडप टाकुन नुकतीच तालुका शिवसेना शिंदे गट बैठक माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. [ads id="ads1"]                    

          तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते याच्या बैठकीत मा.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेऊन आपले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन संचालक निवडून आणले याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे व आपल्या मित्र पक्षाचे कौतुक केले व आपल्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे बाबत विकास कामे करण्याबाबत मार्गदर्शनपर आवाहन केले.[ads id="ads2"]  

  शिवसेनेच्या संघटनेबाबत प्रत्येकाने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ज्या राबविल्या जात आहे त्याबाबत जनतेसमोर जाऊन जनतेला माहिती देऊन मेहनत कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.याप्रसंगी सूर्यभान पाटील सर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी त्यांना संचालकपदी निवड करण्यामध्ये माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व शिवसेनेचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.भरत चौधरी सर यांनी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व लताताई सोनवणे आमदार चोपडा विधानसभा यांची विकास कामे  निवडणुकीत फायदेशीर ठरतील असे मत व्यक्त केले.

या बैठकीत माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे मुख्य मार्गदर्शक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा साळुंखे,सूर्यभान पाटील सर कृ.उ.बा.उपसभापती बबलू कोळी,भरत चौधरी सर, गोटू भाऊ सोनवणे,विकास साळुंखे,लक्ष्मण दादा बडगुजर, विनायक आप्पा पाटील,प्रताप सपकाळे,मोहन सपकाळे, विलास अडाकमोल,दीपक कोळी, पाटील,मुबारक तडवी, पराग महाजन,आशिष झुरकाडे,गजानन कोळी, समाधान सोनवणे,दिनेश साळुंखे,प्रकाश कोडी,राजू पाटील,ईश्वर पाटील, परिसरातील व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी,सरपंच, व ग्रामपंचायत सदस्य शिवसैनिक मोठ्या संख्येने तालुका शिवसेनेच्या बैठकीस उपस्थित असल्याने तालुका शिवसेना बैठक उत्साहात, शांततेत पार पडली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!