यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील बोगस डॉक्टर असल्याचे अनेकवेळा इलेक्ट्रिक मीडिया पोर्टल यांच्या माध्यमातुन वाचा फोडण्यचा प्रेतन केला परंतू कोरपावली गावातील काही बलाढ्य लोकांनी बंगाली डॉक्टरला पाठबळ देउन पाठीशी घालत गावातील गोरं गरीब जनतेच्या जीवाशी खेळ करून महिलेचा मृत्यू कारणीभूत ठरणाऱ्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल का ? अनेक वेळा आरोग्य अधिकारी व सौखेडा सिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी कोरपावली येथील बंगाली डॉक्टरकडे व्हिजिट देऊन पडताळणी केली माञ त्यातून काही सत्य बाहेर आले नाही , सदर बोगस डॉक्टर चौकशी अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविला होता की नाहीं , पाठविला असतात र अद्ापपर्यंत यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील एकाही बंगाली डॉक्टरांवर कारवाई का करण्यात आली नाही.[ads id="ads1"]
बोगस बंगाली डॉक्टरचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला असून यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरपावली येथे बोगास बंगाली डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे एका ५० वर्षीय महिलेला जीव गमविला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर माहिती मिळाल्या नुसार कलिमाबई अश्रफ तडवी वय ५० यंना काही किरकोळ आजाराची लक्षणे जाणवत असताना त्यांनी गावातील परप्रांतीय असलेल्या बंगाली डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी गेले असता डॉक्टर याने मयत कलीमाबई यांना कमरेवर इंजेक्शनाचा डोस दिला होता, असता सदर महिलेस कमरेच्या भागास सेप्टिक झाल्याने तीन ते चार दिवसांपासून त्रास जानवित असताना बंगाली डॉक्टरने पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात सांगीतले , मात्र मंगळवारी उपचाादरम्यान सकाळी ११ वाजेला त्यांच्या राहत्या घरी निधन झाले,
यावल तालुका वैद्यकिय असोशिअस्न यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला होता, जर वेळीच वैद्यकीय अधिकारी यांनी वेळीच दखल घेतली असली तर आज एका आदिवासीं घरातील कर्त्या महिलेला जीव गमविण्यची वेळ आली नसती,
पुढील चौकशी अहवाल काय म्हणणार याकडे संपुर्ण गावाचे लक्ष लागून आहे, बोगस बंगाली डॉक्टरच्या मागे कुणी प्रतिष्ठित नागरिका आहेका असा तर्क वितर्क ग्रामस्थांतून लावले जात आहे


